महाविकास आघाडीला हादरा; कर्जतमध्ये भाजपची खेळी यशस्वी, नगराध्यक्षा राऊत यांचा राजीनामा

मंत्रिमंडळाने नगरसेवकांच्या ठरावाने नगराध्यक्ष हटवण्या संदर्भात निर्णय घेतला त्यावर रोहित पवारांनी टीका करत कर्जतसाठी सरकारने कायदाच बदलला अशी टीका केली. न

कर्जत : नुकताच मंत्रिमंडाळाने नगराध्यक्ष हटवण्यासाठी नगरसेवकांचा ठराव पुरसे असल्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा पहिला फटका कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांना बसला आहे. कर्जत नगरपंचायतीवर एक हाती वर्चस्व असलेल्या महाविकास आघाडीचे तब्बल11 नगरसेवक फोडत नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला.

या ठरावर आज मतदान होणार होते. मात्र, मतदानापू्र्वीच वैयक्तिक कारण देत नगराध्यक्ष उषा राऊत यांनी राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. त्यामुळे कर्जतमध्ये भाजपची खेळी यशस्वी ठरली असून महाविकास आघाडीच्या सत्तेला हादरा बसला आहे.

कर्जत नगरपंचायतीचे निवडणूक 2022 मध्ये झाली होती. या निवडणुकीत 17 जागांसाठी मतदान झाले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 12, काँग्रेसला तीन तर भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीच्या आधी रोहित पवारांनी भाजपचे नगरसेवकांना फोडून राष्ट्रवादीत घेत त्यांना तिकीट दिले होते.

महाविकास आघाडी फोडली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 नगरसेवकांपैकी 8 जणांना भाजपने फोडले तर काँग्रेसचे तीनही नगरसेवक भाजपच्या गळाला लागले. भाजपकडे स्वतःचे दोन नगरसेवक होते. त्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत आले. मात्र, नगराध्यक्षाला हटवता येत नसल्याने त्यांची गोची झाली होती.

कर्जतसाठी कायदाच बदलला

मंत्रिमंडळाने नगरसेवकांच्या ठरावाने नगराध्यक्ष हटवण्या संदर्भात निर्णय घेतला त्यावर रोहित पवारांनी टीका करत कर्जतसाठी सरकारने कायदाच बदलला अशी टीका केली. नगराध्यक्ष हटवण्याचे अधिकार नगरसेवकांच्या ठरावाने आल्याने भाजपने फोडलेल्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष उषा चव्हाण यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला. मात्र, या ठरावाला सामोरे न जाता राऊत यांनी आपला राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News