रायगड : गृहमंत्री अमित शाह हे आज रायगडच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिधीनुसार पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनाराजे भोसले हे देखील उपस्थित होते.
शिवाजी महाराजांच्या अभिवादनानंतर कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणात गृहमंत्री अमित शाह-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाच जाहीर मागण्या केल्या. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

उदयनराजेंनी केलेल्या मागण्या
- छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांना कारवाई करणारा कायदा असावा. ज्यामध्ये आरोपीला बेल मिळणार नाही आणि त्याला दहा वर्षाची शिक्षा होईल.
- दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात यावे.
- अरबी समुद्रातील स्मारकाला काही पर्यवरणाच्या अडचणी असतील तर ते स्मारक राजभवनाच्या जागेमध्ये व्हावे
- शिवासजी महाराजांवर सिनेमे आणि कादंबरी लिहिताना इतिहासाची मोडतोड केली जाते. त्यामुळे सेन्साॅर बोर्डाची निर्मिती करावी.
- बुद्धा सर्किटप्रमाणे महाराजांसाठी देखील योजना असावी. त्यांच्या गड किल्लांचे संवर्धन व्हावे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांच्या मागण्यांविषयी बोलताना म्हटले की, शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोकावून टाकले पाहिजे. पण आपण लोकशाहीत आहोत त्यामुळे कारवाईसाठी कायदा करण्यात येईल. उदयनराजे यांच्या मागण्यासंदर्भात आमची बैठक झाली आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकचा प्रश्न हायकोर्टात आहे. मात्र, आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आपण लढत राहू.