मुंबई – आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी सर्वंच राजकीय पक्षांनी रणनीती आणि मोर्चेबांधणी आखायला सुरू केले आहे. या धर्तीवर आरोप आणि प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात. मागील वीस वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना ठाकरे गटाची सत्ता आहे. परंतु मुंबईकरांसाठी त्यांनी काहीच केलं नाही, असा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे. यावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
मनसे भाजपाची ‘बी’ टीम…
दरम्यान, मनसे पक्ष हा सोयीनुसार भूमिका बदलतो, असं लोकं बलोतात. पण मनसे सेटिंग्ज करते. किंवा भाजपासोबत त्यांचे आतले संबंध आहेत. वरुन जरी टिका करत असले तरी मनसे हा पक्ष भाजपासोबत सेटिह्ज करतो. मनसे हा भाजपासोठी काम करतो, त्यामुळं मनसे ही भाजपाची ‘बी’ टीम… आहे. असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेवर केली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या आरोपाला मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

…मग त्यांची ‘ढ’ टीम
आदित्य ठाकरेंनी मनसेवर टीका केल्यानंतर मनसे आक्रमक होत आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. आम्हाला तुम्ही बी टीम म्हणता, मग तुम्ही कोण ‘ढ’ टीम आहात का, आम्ही आणि राजसाहेबांनी मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे, म्हणून आदित्य ठाकरे यांच्या पोटात वळवळत आहे. आणि हे कोण आम्हाला ही टीम म्हणणारे. मग त्यांची ‘ढ’ टीम आहे, अशी टिका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर आणि ठाकरे गटावर केली आहे.