भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. मंगळवारी CM मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयमध्ये कॅबिटनेटची बैठक झाली. या बैठकीत गाईंच्या चाऱ्यासाठी प्रत्येक गाईमागे 20 रुपये अनुदान वाढवून 40 रुपये करण्याच्या प्रस्तावसह तब्बल 12 पेक्षा अधिक प्रस्तावांवर चर्चा झाली.
मोहन यादव सरकारने निर्णय घेतला आहे की, येणाऱ्या पाच वर्षांच गव्हाचे समर्थन मूल्य 2700 रुपये प्रति क्विंटल केले जाईल. हरभरा आणि मसूर या पिकांच्या खरेदीबाबात देखील निर्णय झाला असून खरेदी देखील सुरू आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश सरकारकडून 12 ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये दिल्लीतील लाल किल्यामध्ये विक्रम महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री देखील सहभागी होतील. या महोत्सवता सम्राट विक्रमादित्य यांच्यावर आधारीत नाटक, एक्सपो असणार आहे.

मोहन यादवांचे यांचे मोठे निर्णय
-
14 एप्रिल डॉ. बाबासाहे अंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच याच दिवशी
‘डॉ. अंबेडकर पशुपालन विकास योजना’ देखील सुरू केली जाईल. - गायींच्या चाऱ्यासाठी दिली जाणाऱ्या अनुदानात वाढ करत 20 रुपयावरू हे दर दुप्पट करत 40 करण्यात आले.तसेच गौशाळा पीपीपी माॅडेलनुसार बनवल्या जाणार आहेत. 25 गायी किंवा 25 म्हशींचे युनिटची स्थापना केली जाईल. त्यामध्ये 42 लाखांची गुंतवणूक असले
- “डॉ. भीमराव अंबेडकर दुग्ध उत्पादन योजनेच्या सुरुवात करण्यासाठी 25 अनुदान दिले जाईल. तसेच अनुसूचित जाती और अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांसाठी 33% अनुदान दिले जाणार आहे.
- नव्या योजनेअंतर्गत 5000 से 20,000 गौवंश ठेवण्यासाठी पीपीपी (PPP) माॅडेलवर गोशाळा बनवल्या जातील. गोशाळ तयार करण्यासाठी तीन वर्षांचा काळ निश्चित करण्यात आला आहे. मात्र, सुरुवातीच्या टप्यात गोशाळा माॅडेलसाठी एक ते दीड वर्षांचा कालावधी असणार आहे.
- ग्वालेरच्य पश्चिम बायपस सह अनेक योजनांना मंजुरी मिळाली. राज्यासाठी केंद्र सरकारडून 4300 कोटी रुपये मंजुर केले आहेत.
- केंद्राने दिलेल्या निधीतून ग्वालेर पश्चिम बायपास, संदलपुर-नसरुल्लागंज बायपास आणि सागर बायपास तयार केला जाणार आहे.
- विद्युत कंपनीला 1200 कोटी रुपये रोख ठेवण्याची सुविधा दिला जाणार
- पार्वती-काली-चंबल लिंक योजनेला मंजुरी. 2932 कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या या योजनेतून 60,000 हेक्टर जमिनीवर सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
चंबळ-पार्वती-काळीसिंध लिंक योजनेअंतर्गत मंदसौर जिल्ह्याच्या मल्हारगढ येथे लघु सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
- राज्याच्या प्रमुख रस्त्यांच्या विकासाठी केंद्र सरकारडून 4303 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबद्दल कॅबिनेटकडून केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले.
पीएम मोदी-अमित शाह मध्य प्रदेशात येणार
CM डॉ. मोहन यादव यांनी कॅबिनेट बैठकीच्या आधी संवाद साधताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 एप्रिलला अशोकनगर जिल्ह्यातील आनंदपूर ट्रस्ट आश्रमामध्ये येणार आहेत. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 13 एप्रिलला भोपाळमध्ये येणार आहेत. अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय डेयरी विकास बोर्ड आणि राज्य सरकार दूध संघामधील सहकार्याच्या करारावर स्वाक्षरी केली जाईल.