हिजडेपणाचं लक्षण, पाकिस्तानची मस्ती उतरवली जाईल; पर्यटकांवरील हल्ल्यावर एकनाथ शिंदें संतापले

मुंबई : काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 27 पर्यटकांवर जीव गमवावा लागला या हल्ल्याच्या निषेध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी केला आहे. या क्षणाला माझ्या मनात संताप, दु:ख, वेदना आहेत. निरपराध पर्यटकांचे हकनाक रक्त तिथे सांडलंय. असल्या भ्याड कुरापती करणारे अतिरेकी आणि त्यांना पोसणारा पाकिस्तान यांची मस्ती उतरवली जाईल, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

नि:शस्त्र पर्यटकांवर हल्ले करण्यात फुशारकी मारणं हे हिजडेपणाचं लक्षण आहे. हा खेळ पाकड्यांनी सुरु केला असला तरी त्याचा दि एण्ड भारतीय जवान समर्थपणे करतील. कारण नवा भारत हा ‘घुसके मारेंगे’ असं सांगून आरपार घुसवणारा आहे, हे त्यांना लवकरच कळेल, असा इशाराही शिंदें यांनी दिला.

डाव यशस्वी होणार नाही

मी या हल्ल्याचा कडाडून धिक्कार करतो. हा अतिरेक्यांचा डाव कधीही सफल होणार नाही. मी मृत पर्यटकांना श्रध्दांजली वाहतो. त्यांचे हौतात्म्य वाया जाणार नाही. त्यांच्या आप्तांना राज्य सरकारतर्फे सर्वतोपरि सहाय्य केले जाईल, असे देखील शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी निष्पाप नागरिकांवर केलेला भ्याड हल्ला अत्यंत दुःखद आणि संतापजनक आहे. या अमानवी कृत्यात जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. आपल्या शूर जवानांकडून या भ्याड हल्ल्याला निश्चितच योग्य प्रत्युत्तर दिले जाईल ही आशा करतो, असे ट्विट दहशतवादी हल्ल्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

चोख प्रत्युत्तर देऊन…

काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी धक्कादायक आणि वेदनादायी आहे. ह्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या प्रियजनांप्रती सहवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर आराम पडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अश्या भ्याड हल्ल्यांचा केवळ निषेध केला जाणार नाही तर चोख प्रत्युत्तर देऊन आपल्या सीमांचं आणि नागरिकांचं रक्षण केलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हणत दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची अपेक्षा व्यक्त केली.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News