माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने करुणा मुंडे यांना पोटगी पोटी देण्यात येणाऱ्या 2 लाख रुपये रकमेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी प्रकरणात धनंजय मुंडे यांनाच उच्च न्यायालयाने दणका दिल्याच पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढणार असच दिसत आहे.
धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका
वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा या पोटगीस पात्र असल्याचं मान्य करत त्यांना दरमहा 1 लाख 25 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. यालाच धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि यावर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठापुढे सुनावणी पार पडली आणि न्यायमूर्ती यांनी धनंजय मुंडे यांनाच दणका दिला

पोटगीची रक्कम देण्याचे मुंडेंना निर्देश
करुणा शर्मा यांना लागू झालेल्या पोटगीतील 50% रक्कम चार आठवड्यात न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. “मुंडे हे मूळात चांगले आहेत, पण त्यांच्यामागे असलेल्या ‘दलाल गँग’मुळेच त्यांची चुकीची पावलं पडत आहेत,” असा दावा करुणा मुंडे यांनी केला. सोबतच कोर्टाची मी आभार मानते, त्यांनी मला न्याय दिला. अशी प्रतिक्रिया ही त्यांनी यावेळी दिली आहे.
धनंजय आणि करूणा मुंडे यांच्यातील वाद न्यायालयीन पोटगी प्रकरणातून सुरू झाला. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय यांना दोषी ठरवून करूनाला दरमहिनय़ाला ₹2 लाख पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. धनंजय यांनी माझगाव न्यायालयात आव्हान दिली, परंतु ती फेटाळली गेली. करूणा यांनी त्यांच्यावर औरंगजेबापेक्षा क्रूर असा आरोपही केला आहे.