गडचिरोली जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर, अंगणवाड्यांचे ई-लर्निंग सुविधांसह अद्ययावतीकरण

Gadchiroli Anganwadis : राज्यातील अंगणवाड्यांबाबत एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील अंगणवाड्यां ह्या अधिक तांत्रिक आणि ई-लर्निंग करण्यावर सरकारचा भर आहे. याचाच एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यात ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम गडचिरोलीत राबविण्यात येत आहे.

जनजागृती कार्यक्रम राबविले जाणार…. 

दरम्यान, अंगणवाडी केंद्रात सकाळच्या सत्रात बालकांना शिक्षण व पोषण साहाय्य दिले जाईल. तर दुपारच्या सत्रात महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योजकता जनजागृती कार्यक्रम राबविले जाणार आहेत. तसेच ‘नंदघर’ मध्ये तीन ते सहा वर्षे वयोगटासाठी मुलांना बालशिक्षण तसेच आरोग्य व पोषण साहाय्य देण्यात येणार आहे. तर दुपारी महिलांसाठी आरोग्य व सूक्ष्म उद्योग विषयक जनजागृती कार्यक्रम घेतले जाणार आहेत. असं सांगण्यात येत आहे.

महिलांना रोजगारभिमुख प्रशिक्षण…

या 100 अंगणवाड्यांमध्ये 1,134 किशोरी मुलींना दुपारच्या सत्रात उद्योग पूरक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  एकूण शून्य ते सहा वर्षाची 3 हजार 867 बालके व 602 गरोदर व स्तनदा मातांना लाभ मिळणार आहे. हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा शासनाचा मानस आहे. गडचिरोलीतील दुर्गम भागातील महिला व बालकांच्या आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यास व महिलांना रोजगारभिमुख प्रशिक्षण दिल्याने त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्यास मदत होणार आहे.

संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार…

दरम्यान, हा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने जिल्हा परिषद गडचिरोली व वेदांत ग्रुपच्या अनिल अग्रवाल फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU) झाला आहे. अंगणवाड्यांमध्ये पाणी, स्वच्छतागृह, वीजपुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. प्रकल्पाची अंमलबजावणी व त्यावरील देखरेख करण्यासाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News