काँग्रेसच्या अधिवेशनला प्रियांका गांधींची दांडी? काय आहे सत्य?

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला असणाऱ्या गुजरात राज्यामध्ये तब्बल 64 वर्षाने काँग्रेसचे अधिवेशन झाले. या अधिवेशनातून गुजरात काँग्रेसला बळ मिळेल, अशी शक्यता आहे. मात्र, या अधिवेशनासाठी राहुल गांधी, सोनिया गांधी उपस्थित असताना वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी दांडी मारल्याची चर्चा आहे.

प्रियांका गांधी या काँग्रेस अधिवेशनासह लोकसभेत वक्फ विधेयकाच्या मतदानाच्या वेळी देखील गैरहजर होत्या. त्यामुळे प्रियांका नाराज असल्याच्या देखील चर्चा होत्या. मात्र, प्रियांका गांधी का गैरहजर होत्या याचे कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले आहे.

जयराम रमेश म्हणाले, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीला तब्बल 35  नेत गैरहजर होते. मात्र, प्रियांका गांधी यांच्या गैरहजरबाबत चर्चा करणे योग्य नाही. प्रियांका  गांधी यांचा अधिवेशनाच्या आधीच परदेश दौरा ठरला होता. त्या परवानगी घेऊन अनुपस्थित राहिल्या आहेत.

खर्गेंची पंतप्रधान मोदींवर टीका

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. भाजप समाजामध्ये फूट पाडून सत्येवर कायम राहता आहे. मोदी सरकार आणि स्वतः पंतप्रधान मोदी हे देशातील उद्योग सर्वकाही आपल्या उद्योगपती मित्रांच्या हवाली करत आहेत. त्यामुळे देशाच्या सरंक्षणला धोका निर्माण होऊ शकतो. पंतप्रधान सर्व काही विकून निघून जातील, असा टोला देखील खर्गे यांनी लगावला.

 ओबीसींकडे दुर्लक्ष

अधिवेशाच्याआधी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या रणनितीविषयी भाष्य केले. ते म्हणाले, काँग्रेस मुस्लिम, दलित, ब्राम्हणांमध्ये गुंतून पडली. आणि ओबीसी समाज त्यांच्यापासून दुरावला. काँग्रेस अल्पसंख्यांका विषयी जी काही भूमिका मांडेत त्यावर टीका केली जात आहे. विशेषता मुस्लिमांबाबत घेतलेल्या भूमिकेवर टीका केली जाते. मात्र काँग्रेस नेत्यांनी न घाबरता आपली भूमिका मांडली पाहिजे.

 


About Author

Astha Sutar

Other Latest News