आदित्य ठाकरे यांचे लग्न होत नाही, याला एकनाथ शिंदे जबाबदार नाही, संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला

शिवसेनाप्रमुख हे कधी शिवसेनाप्रमुख म्हणून जगले नाहीत. तर शिवसैनिक म्हणून जगले. आणि हे राजासारखे जगत आहेत. आता आदित्य ठाकरे यांचे लग्न झालं नाही, याला एकनाथ शिंदे जबाबदार आहेत का? अशी बोचरी टिका मंत्री संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

मुंबई – तुम्ही आम्हाला बकऱ्याच्या भूमिकेत पाहता, पण तुम्ही गाढवाच्या भूमिकेत आहात. रोज सकाळी उठून भुंकता, आता तुमच्या या भुंकन्याने, ओरडण्याने लोकांचे कान फाटायला लागलेत. आणि कोणतरी येऊन तुमच्या एक दिवस कानफाड्यात लगावेल, असा टोला संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना लगावला. दरम्यान, आदित्य ठाकरे आणि उबाठा गट हा राजाच्यासारखे जगत आहेत.  आजूबाजूला बघा शिवसेनाप्रमुख हे कधी शिवसेनाप्रमुख म्हणून जगले नाहीत. तर शिवसैनिक म्हणून जगले. आणि हे राजासारखे जगत आहेत. आता आदित्य ठाकरे यांचे लग्न झालं नाही, याला एकनाथ शिंदे जबाबदार आहेत का? अशी बोचरी टिका मंत्री संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

लबाड लांडगा सत्तेपासून दूर…

दरम्यान, संजय शिरसाट यांना आगामी पालिका निवडणुकीबाबत विचारले असता, या वेळेला लबाड लांडगे सत्तेपासून दूर राहील आणि येत्या निवडणुकीत सुद्धा त्यांना जनता दूर फेकून देईल, अशी टीका संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर केली. यांनी वीस वर्षे सत्ता भोगली. फक्त टक्केवारी आणि कमिशन एवढेच माहित आहे. रस्त्याची अवस्था यापूर्वीचे बघा आणि आताचे रस्ते बघा, म्हणजे तुम्हाला फरक कळेल. त्यामुळे आता हे सगळे जनतेला कळलं असून, या लबाड लांडग्यांना लोकं सत्तेपासून दूर ठेवतील, असं संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली.

दानवेंना चंद्रकांत खैंरे यांना संपवायचंय…

सरीकडे छत्रपती संभाजीनगर मधील शिवसेनेच्या (ठाकरे) दोन नेत्यांमध्ये वाद सुरू आहे. अंबादास दानवे यांच्यावर चंद्रकांत खैरे यांनी काही गंभीर आरोप केलेत. दानवे हे आपणाला मान सन्मान देत नाहीत. त्यामुळं आपण अंबादास दानवेंची तक्रार उद्धव ठाकरेंकडे करणार असल्याचे खैरेंनी म्हटले आहे. यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, शेवटी चंद्रकांत खैरे कंटाळून हे आमच्याकडे येऊ शकतात. आमच्या पक्षात येऊ शकतात, असा विश्वास संजय शिरसाठ यांनी व्यक्त केला. दरम्यान, आम्ही उठाव केला त्या दिवसांपासून ठाकरे गट भाजपाच्या संपर्कात आहे. ठाकरे गटाला भाजपासोबत जायचं होतं. आणि शिंदेंना रोखायचं होतं, असा आरोपही संजय शिरसाट यांनी केला.


About Author

Astha Sutar

Other Latest News