जगात पहिल्यांदाच झाली रोबोट्सची बॉक्सिंग टूर्नामेंट, ४ रोबोट भिडले, जिंकलं कोण? पाहा

रोबोट बॉक्सिंग टूर्नामेंटमध्ये एकूण ३ राउंड झाले. प्रत्येक राउंड २ मिनिटांचा होता. पॉइंट सिस्टम ठेवण्यात आला होते. हाताने मारल्यास रोबोटला १ पॉइंट आणि पायाने मारल्यास ३ पॉइंट दिले जात होते.

World First Robot Boxing Tournament : प्रगत तंत्रज्ञान आता लोकांसाठी मनोरंजनाचे साधन बनले आहे. रोबोटिक्सच्या क्षेत्रात चीन नवं नवीन आयाम निर्माण करत आहे. जगातील पहिली रोबोट बॉक्सिंग स्पर्धा येथे आयोजित करण्यात आली होती. वृत्तानुसार, ही अनोखी स्पर्धा चीनच्या हांगझोऊ शहरातील युनिटरी कंपनीच्या नवीन फॅक्टरित झाली.

या दरम्यान, ४ युनिटरी जी१ रोबोट्समध्ये बॉक्सिंगची लढत आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे चारही रोबोट्स दूर बसलेल्या मानवांकडून नियंत्रित केले जात होते.

या स्पर्धेचे नाव ‘युनिटी आयर्न फिस्ट किंग: अवेकनिंग’ होते यावेळी. रोबोट्स एकमेकांशी खूप लढले आणि शेवटी विजेता देखील निवडला गेला.

२-२ मिनिटांचे ३ राउंड खेळवले गेले

रिपोर्टनुसार, रोबोट बॉक्सिंग टूर्नामेंटमध्ये एकूण ३ राउंड झाले. प्रत्येक राउंड २ मिनिटांचा होता. पॉइंट सिस्टम ठेवण्यात आला होते. हाताने मारल्यास रोबोटला १ पॉइंट आणि पायाने मारल्यास ३ पॉइंट दिले जात होते. फाईट दरम्यान जर एखादा रोबोट खाली पडला, तर त्याला उठण्यासाठी ८ सेकंद दिले जात होते. जर रोबोट ८ सेकंदात उठू शकला नाही, तर त्याचे पॉइंट्स कमी केले जात होते.

AI स्ट्रॅटेजिस्टसमोर टिकू शकला नाही आर्टिसन

या रोबोट बॉक्सिंग टूर्नामेंटमध्ये सहभागी झालेल्या चारही रोबोट्सना नावं देण्यात आली होती. रिपोर्टनुसार, पहिला सामना “AI स्ट्रॅटेजिस्ट” आणि “सिल्क आर्टिसन” यांच्यात झाला. AI स्ट्रॅटेजिस्टने सुरुवातीपासूनच जोरदार हल्ले केले. त्याचे पंचेस अगदी माणसांसारखे वाटत होते. तिसऱ्या राउंडमध्ये त्याने सिल्क आर्टिसनला चीतपट केले.

दुसरा सामना “आर्मर्ड मुलान” आणि “एनर्जी गार्डियन” यांच्यात झाला. पहिल्या राउंडमध्ये आर्मर्ड मुलानने वर्चस्व राखले, पण तिसऱ्या राउंडपर्यंत येईपर्यंत तो थकला आणि शेवटी एनर्जी गार्डियनने विजय मिळवला.

रोबोट बॉक्सिंग टूर्नामेंट कोणी जिंकले?

रिपोर्टनुसार, अंतिम सामना AI स्ट्रॅटेजिस्ट आणि एनर्जी गार्डियन यांच्यात झाला. AI स्ट्रॅटेजिस्टने सतत आक्रमक खेळ केला आणि तीनही राउंड्समध्ये एनर्जी गार्डियनला पराभूत केले. त्यामुळे AI स्ट्रॅटेजिस्ट या स्पर्धेचा विजेता ठरला.

या टूर्नामेंटने काय सिद्ध केले?

रिपोर्टनुसार, कोणत्याही खेळात ताकदीसोबतच बुद्धीही महत्त्वाची असते. या रोबोट्सनी रिअल टाइममध्ये एकमेकांचे हल्ले समजून घेतले आणि प्रतिस्पर्ध्याच्या हालचालींचा अचूक अंदाज लावला. तज्ज्ञ याकडे एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहत आहेत.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व रोबोट्समध्ये काही समान फिचर्स होती. जसे की,

  • उंची: सुमारे १.३ मीटर
  • वजन: सुमारे ३५ किलोग्रॅम
  • २३ डिग्री कोनात फिरण्याची क्षमता
  • लवकर चालण्याची आणि पडल्यावर पटकन उभे राहण्याची क्षमता.

About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News