सर्वाधिक विमान अपघात कोणत्या देशात होतात? आकडे पाहून चकित व्हाल

गुजरातच्या अहमदाबादमध्ये नुकताच झालेला विमान अपघात संपूर्ण देशाला हादरवून गेला. या भीषण दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातानंतर समोर आलेले व्हिडिओ हादरवणारे होते. या घटनेतील मृतांचा अंतिम संस्कार अद्याप सुरू असतानाच, दुसऱ्याच दिवशी केदारनाथ येथे एक हेलिकॉप्टर कोसळले आणि त्यात 7 जणांचा मृत्यू झाला.

विमान अपघातांमध्ये भारत टॉपवर आहे, असं अनेकांना वाटतं, मात्र वास्तव वेगळं आहे. जगात एक देश असा आहे जिथे विमान अपघातांची संख्या ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

सर्वात मोठा विमान अपघात अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या सुमारे 10 वर्षांपूर्वी 2015 मध्ये झाला होता. विमान दुबईहून परतत असताना केरळमध्ये झालेल्या पावसामुळे ते धावपट्टीवरून घसरले आणि त्याचे दोन तुकडे झाले. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला. या विमानात 190 लोक बसले होते.

सर्वाधिक विमान अपघात कोणत्या देशात?

Statista च्या एका अहवालानुसार (1945 ते 2022), सर्वाधिक विमान अपघात अमेरिकेत झाले आहेत. गेल्या 77 वर्षांत अमेरिका एकूण 864 विमान अपघात घडले आहेत. म्हणजेच अमेरिकेत दरवर्षी सरासरी 11–12 अपघात घडतात.

रशिया दुसऱ्या क्रमांकावर असून तिथे 539 अपघात झाले आहेत. त्यानंतर कॅनडा (191), ब्राझील (190), आणि कोलंबिया (184) या देशांचा क्रमांक लागतो.

 भारताचा क्रमांक कितवा?

आशियामध्ये विमान अपघातांच्या बाबतीत भारताचा क्रमांक दहावा आहे. मागील 77 वर्षांत भारतात एकूण 95 विमान अपघात झाले आहेत. भारतानंतर चीनचा क्रमांक असून तिथे 76 अपघात घडले आहेत.

मात्र, मृत्यू संख्येच्या दृष्टीने एशियात इंडोनेशिया आघाडीवर आहे. ASN च्या अहवालानुसार, गेल्या 25 वर्षांत इंडोनेशियात 20 पेक्षा जास्त मोठे अपघात झाले, ज्यात सुमारे 2000 लोकांचा मृत्यू झाला आहे. या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 15 पेक्षा जास्त अपघात झाले आहेत.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News