अलीकडेच अहमदाबादमध्ये एक प्रवासी विमान रहिवासी भागात कोसळले. या भीषण दुर्घटनेत 241 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर गेल्या रविवारी केदारनाथमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळले, ज्यात 7 जणांचा मृत्यू झाला. हे दोन्ही अपघात सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. अहमदाबादमधील विमान अपघात खूपच भयानक होता. या विमानात इतकं इंधन भरलेलं होतं, किंवा असं म्हणता येईल की त्याचा टँक पूर्णपणे भरलेला होता, कारण हे विमान लंडनला जाणार होतं. त्यामुळे अपघात इतका गंभीर झाला की, यात केवळ एका व्यक्तीचा जीव वाचला.
विमानात इंधन कुठे आणि कसं भरलं जातं?
फ्युएल टँक कुठे असतो?

विमानात इंधन भरणं हे त्याच्या इंजिनच्या प्रकारावर अवलंबून असतं. विमानांमध्ये इंधनाचा वापर अत्यंत जास्त प्रमाणात होतो. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की विमानात इंधन मुख्य बॉडीमध्ये नाही तर त्याच्या पंखांमध्ये साठवले जाते. हे दोन्ही पंख खूप मोठ्या प्रमाणात इंधनाचं वजन सांभाळतात.
फ्युएल विंग्समध्ये ठेवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे हवेत विमानाच्या वजनाचा आणि लिफ्ट फोर्सचा समतोल राखणे. विमानाला हवेत स्थिर ठेवण्यासाठी त्याच्या वजनाच्या प्रमाणात लिफ्ट फोर्स पंखांवर असणे अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच इंधन पंखांमध्ये भरले जाते.
पोकळ असतात विमानाचे पंख
विमानाचे पंख दिसायला मोठे असले तरी ते आतून पूर्णपणे पोकळ असतात. या पोकळ भागातच जेट फ्युएल भरले जाते. जर इंधन इतर कुठल्या भागात भरले गेले असते, तर विमानाच्या संतुलनात अडचण येऊ शकते.
तथापि, लांब पल्ल्याच्या विमानांमध्ये फक्त पंखांमध्येच नव्हे, तर विमानाच्या मध्यभागीही एक मोठा इंधन टँक असतो, ज्याला सेंट्रल फ्युएल टँक म्हणतात. हा टँक खूप लांबच्या अंतरासाठी वापरला जातो.
इंधन कसं भरलं जातं?
विमानात इंधन भरण्याची प्रक्रिया सामान्य कारप्रमाणे नसते. मोठ्या विमानतळांवर विमानात फ्युएल भरण्यासाठी खास फ्युएल ट्रक असतात किंवा अंडरग्राउंड पाईपलाइनद्वारे इंधन दिलं जातं.
विमान टेकऑफच्या आधी एक फ्युएल ट्रक विमानाजवळ येतो आणि विमानाच्या पंखांखाली खास नोजल लावलेलं असतं. त्याद्वारे इंधन विमानात भरलं जातं. ही संपूर्ण प्रक्रिया संगणकाद्वारे नियंत्रित केली जाते, जेणेकरून नेमके गरजेइतकेच इंधन भरले जाऊ शकेल.