पुणे : तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य विभाग आणि धर्मादाय आयुक्तांचे अहवाल समोर आले आहेत. या दोनही अहवालामध्ये ससून रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आले आहे. तिसरा ससून रुग्णालयाच्या समितीमार्फत अहवाल येणार असून या अहवालानंतर दीनानाथ रुग्णालयावर कारवाई काय होणार हे स्पष्ट होणार आहे.
ससूनचा अहवाल कधी येणार याची माहिती जिल्हा मेडिकल बोर्डाचे अध्यक्ष यल्लाप्पा यांनी दिली आहे. ते म्हणाले, अहवाल येण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. आमच्याकडे अलंकार पोलिस चौकीतील कागदपत्रे आले आहेत. मात्र, आम्हाला आणखी तीन ते चार रुग्णालयांची कागपत्रे तपासायची आहेत. त्यावर तज्ज्ञ व्यक्तींचे मत घ्यायचे आहे त्यामुळे अहवालाला थोडा उशीर होईल.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून तनिषा भिसे यांच्या उपाचारामध्ये हलगर्जीपणा केल्या की नाही याविषयी अहवाल देणार आहे. तसेच तनिषा भिसे हिच्यावर कोणत्या रुग्णालयात नेमके काय काय उपचार झाले याची देखील तपास करण्यात येणार आहे.
दोन अहवाल मुख्यमंत्र्यांच्या समोर
आरोग्य विभाग आणि धर्मादाय आयुक्तांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णलायविषयी तयार केलेले अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले आहेत. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची धर्मादाय अंतर्गत नोंदणी असूनही त्यांनी तनिषाला उपचार नाकारल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये तनिषाला तब्बल पाच तास थांबवून उपाचारा नाकारून 10 लाख अनामत रक्कम भरायला सांगितल्याचे म्हटले आहे.
तिसऱ्या अहवालानंतरच कारवाई
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई कधी होणार याविषयी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विचारले होते. तेव्हा त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांना दोन अहवाल सादर करण्यात आल्याची माझी माहिती आहे. तिसरा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले होते.
महिला आयोगही कारवाई करणार
अंतर्गत चौकशीच्या नावाखाली दीनानाथ रुग्णालयाच्या समितीने तनिषा भिसे हिची खासगी माहिती सर्वाजनिक केली. त्या विरोधात भिसे कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तसेच महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेतली असून पोलिस आयुक्त तसेच मेडिकल कौन्सिलच्या अध्यक्षांना कारवाईबाबात सूचना केल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.