जगभरातील ठप्प असलेले व्हाट्सअपचे सर्व्हर पुन्हा पूर्ववत, व्हाट्सअपने काय सांगितले?

व्हाट्सअपचे सर्व्हर पुन्हा पूर्ववत झाले आहे. त्यामुळं नेटकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे

मुंबई – सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. एका क्लिकवरती जगभरातील कुठलीही माहिती मिळू शकते. किंवा मोबाईलमधील विविध ॲप्समधून तुम्ही आर्थिक व्यवहारी करू शकता. पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा असं मानवी जीवनात बोलले जायचे. परंतु आता अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता मोबाईल शिवाय माणूस एक मिनिट ही राहू शकत नाही. मोबाईल आणि व्हाट्सअप हे अविभाज्य भाग आहे. मात्र गेल्या काही वेळापासून जगभरातील व्हाट्सअपचे सर्व्हर डाऊन झाले होते. पण व्हाट्सअपचे सर्व्हर पुन्हा पूर्ववत झाले आहे. त्यामुळं नेटकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

मेसेजची ये-जा थांबली होती…

दरम्यान, धकाधकीच्या जीवनात लाईफ प्रत्येकाची फास्ट झाली आहे. आणि या फास्ट लाईफमध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाइल आला आहे. या स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांना मेसेजेस, व्हिडिओ कॉल करून संपर्कात राहतात. परंतु ज्या व्हाट्सअपच्या माध्यमातून लोकं एकमेकांच्या संपर्कात राहतात. तेच व्हाट्सअपचे सर्व्हर गेल्या काही वेळापासून डाऊन झाले होते. त्यामुळे व्हाट्सअपवरील मेसेज पाठवता येत नव्हते. परिणामी नेटकरी त्रस्त झाले होते.

तांत्रिक बिघाड…

दुसरीकडे व्हाट्सअपचे सर्व्हर बिघडल्यामुळे कोणतेही मेसेज पाठवले जात नव्हते. आणि दुसऱ्याचे मेसेज येत नव्हते.. मिळालेल्या माहितीनुसार व्हाट्सअपचे सर्व्हर डाऊन होण्यास कारण म्हणजे सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर आली होती. आता हे व्हाट्सअपचे सर्व्हर पूर्ववत झाले आहे. अशी माहिती व्हाट्सअपच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News