मुंबई – पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यातील 16 पर्यटकांची ओळख पटली असून त्यांची नावं समोर आलेत. तर या 27 पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक असल्याची माहिती समोर येते. महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती येते. यातील तीन पर्यटक डोंबिवलीचे, एक पर्यटक पनवेलचा, तर दोन पुण्याचे पर्यटक असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या भ्याड हल्ल्याची जबाबदारी आता टीआरएफ म्हणजेच ‘द रेजिस्टंस फ्रंट’ संघटना यांनी स्विकारली आहे. ही संघटना नेमकी आहे कशी पाहूया…
टीआरएफ म्हणजेच ‘द रेजिस्टंस फ्रंट’ संघटना काय आहे?
1. काश्मिरातील नरसंहाराची जबाबदारी टीआरएफ संघटनेनं स्वीकारली
2. 2019 साली टीआरएफ संघटना अस्तित्वात आली
3. लष्कर-ए-तोयबाशी टीआरएफ संघटनेचा आणि पाकिस्तानशी संबंध
4. लष्करातील जवान आणि नागरिकांच्या हत्येत सहभाग
5. सीमेपलिकडून हत्यारे आणि ड्रग्ज तस्करीत सहभाग
6. कलम 370 हटवल्यानंतर टीआरएफच्या कारवायांत वाढ
7. आयएसआय हँडलर्स आणि लष्कर ए तोयबाची संघटनेला मदत
8. जैश आणि लष्करच्या दहशतवाद्यांचाच टीआरएफमध्ये सहभाग
9. दहशतवादी संघटनेला जाणीवपूर्वक इंग्रजी नाव देण्यात आलं.

पुण्यातील ६७ जणांचा ग्रुप श्रीनगरमध्ये अडकले…
दुसरीकडे पुण्यातील ६७ जणांचा ग्रुप काश्मीरमध्ये फिरण्यास गेला आहे. जो हल्ला झाला त्याच्या दोन-तीन किली मीटर अंतरावरच हे सर्वजण होते. मात्र हल्ल्याची माहिती समजताच या ६७ जणांचा ग्रुपने श्रीनगरमध्ये राहण्याच निर्णय घेतला. पुढे फिरायला गेले नाहीत. दरम्यान, हे ६७ जण श्रीनगरमध्ये अडकल असून, त्यांनी मदतीसाठी एक व्हीडिओ जारी केला आहे. आम्ही श्रीनगरमध्ये अडकलो आहोत. आणि संपूर्ण काश्मीर बंद आहे. त्यामुळं आम्हाला कुठेही जात येत नाही. त्यामुळं राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आम्हांला येथून बाहेर काढावे, आणि सुरक्षित पुण्यात घेऊन जावे, अशी आम्ही मदतीसाठी विनंती करतो, असं श्रीनगरमधून पर्यटकांनी म्हटले आहे.