मुंबई : प्रशासनिक सेवेत महाराष्ट्र अग्रसेर आहे. तसेच प्रशासनिक सेवेचा महाराष्ट्र राज्याकडून आदर्श देशभरात घेतला जातो. या धरतीवर प्रशासन सेवेतील यशस्वी गोष्टींचे प्रमाणिकरण होणे आवश्यक आहे. जेणेकरुन अधिकाऱ्यांच्या कल्पकतेतून यशस्वी केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा व्यापक उपयोग होईल, आणि त्यादृष्टीने सर्व विभागांनी टास्क फोर्स निर्माण केला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील सन २०२३-२४ तसेच सन २०२४-२५ या वर्षातील पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
लोकसेवेच्या भावनेतून केलेल्या कामाचे समाधान…
दरम्यान, पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने १०० दिवसाच्या कृती आराखड्यात प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या महत्त्वाचा वाटा आहे. इच्छाशक्तीचे असून काम पारदर्शक आणि गतीमानतेने यशस्वी होते याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक ठिकाणी जेव्हा लोक वीस तीस वर्षांपूर्वी केलेल्या एखाद्या अधिका-याच्या कामाचा दाखला देतात तेव्हा आपल्या कामातून मिळविलेली ही ओळख मोठी गोष्ट असते. विशेष म्हणजे लोकसेवेच्या भावनेतून केलेल्या कामाचे समाधान हे अधिका-यांनाही वेगळा आनंद देऊन जाते. चांगल्या भावनेतून केलेले काम हे यशस्वी होतेच. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात .तंत्रज्ञानाचा व्यापक स्विकार आणि वापर हा गरजेचा आहे.अनेक विभागांच्या चांगल्या कल्पनांचे,निर्णयाचे प्रमाणिकरण व्हायला पाहिजे, जेणेकरुन व्यापक स्तरावर त्या कामांचा लाभ इतरांनाही होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्राला प्रशासकीय कार्यपद्धतीचा वारसा…
प्रशासनात लोकाभिमुख दृष्टिकोन, पारदर्शक कारभार आणि गतिशील कार्यपद्धती महत्वाची आहे. यामुळे लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणता येतो. लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी अधिका-यांची असते. महाराष्ट्राला ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी महाराष्ट्र प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीने मुदतीपूर्वीच साध्य करु शकते. महाराष्ट्राला शिवकालीन काळापासून प्रशासकीय कार्यपद्धतीचा उत्कृष्ट वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राच्या सक्रिय सहभागातून देशाचे ध्येय साध्य होण्यास मोठे सहाय्य मिळते. या सर्वांत प्रशासकीय अधिका-यांचे पारदर्शक, योगदान, गतिमानता, लोकाभिमुख कार्यपद्धतीचा स्विकार निश्चितचं महत्वाची भूमिका पार पाडणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर महासंचालक राहुल रंजन महिवाल आदी सनदी अधिकारी उपस्थित होते.