अमित शाहांच्या ‘त्या’ डावाने सगळी गणितच बदलली, तब्बल 11 वर्षानंतर एनडीएला राज्यसभेत बहुमत

लोकसभेप्रमाणे राज्यसभेत देखील भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपकडे तब्बल 98 सदस्य आहेत. त्यानंतर नितीशकुमारांच्या जदयूकडे चार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे तीन, तेलगू देसमकडे दोन आणि नव्याने सामील झालेल्या AIADMK कडे चार सदस्य आहेत.

 

नवी दिल्ली ः भाजपचे लोकसभा आणि राज्यसभेत वर्चस्व आहे. एनडीए म्हणून भाजपला जरी लोकसभेत बहुमत असले तरी राज्यसभेत मात्र बहुमतापासून दूर होता. मात्र, अमित शाहांच्या एका खेळीमुळे राज्यसभेत देखील एनडीए बहुमतामध्ये आली आहे.

अमित शाह यांनी तमिळनाडूतील अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) पक्षासोबत युतीची घोषणा नुकतीच केली. या घोषणेमुळे राज्यसभेतील AIADMK चे खासदार एनडीएसोबत आहेत. त्यामुळे एनडीएला राज्यसभेत बहुमतामध्ये आली आहे.

बहुमताचा आकडा किती?

राज्यसभेत एकुण सदस्य संख्या 245 आहे. मात्र, सध्या नऊ जागा रिक्त असून सभागृहात 236 सदस्य आहेत. 245 सदस्य असलेल्या सभागृहात बहुमताचा आकडा 123 आहे.

एनडीएकडे किती सदस्य?

AIADMK एनडीएची सदस्या संख्या 119 होती. त्यामुळे बहुमतापासून एनडीए तीन सदस्य दूर होते. तरी देखील कोणतेही विधेयक पास करण्यासाठी त्यांना अडचण आली नाही. 9 जागा रिक्त असल्याने तांत्रिकदृष्ट्या एनडीएकडे बहुमत होत होते. शिवाय काही छोटे पक्ष देखील त्यांना मदत करत होते. मात्र, AIADMK चे सदस्य एनडीएसोबत असल्याने बहुमताचा आकडा एनडीएने गाठला आहे.

भाजप सर्वात मोठा पक्ष

लोकसभेप्रमाणे राज्यसभेत देखील भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपकडे तब्बल 98 सदस्य आहेत. त्यानंतर नितीशकुमारांच्या जदयूकडे चार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे तीन, तेलगू देसमकडे दोन आणि नव्याने सामील झालेल्या AIADMK कडे चार सदस्य आहेत. तर एनडीएमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसह तब्बल 11 पक्षांकडे प्रत्येकी एक सदस्य आहे.

 

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News