Rain Update: आनंदाची बातमी! राज्यात पाऊस 8 जूनपर्यंत सक्रिय होणार! हवामान खात्याचा अंदाज

राज्याच्या कोकण पट्ट्यात आणि मुंबई शहराच्या परिसरात यंदा पाऊस जूनच्या सुरूवातीलाच सक्रीय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबई: सध्या महाराष्ट्रासह देशभरात असह्य उकाडा जाणवत आहे. या उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा मोसमी पाऊस नेहमीच्या वेळेआधी जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत आणि कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांची उकाड्यापासून लवकरच सुटका होणार असून पावसाळ्यासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

मुंबईकरांना लवकर दिलासा

मुंबईत असलेल्या प्रचंड उष्णतेमुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. पण आता हवामान विभागाचा अंदाज आहे की जूनच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजेच 8 ते 11 जून दरम्यान मुंबईत मोसमी पाऊस येण्याची शक्यता आहे. हा अंदाज 92 टक्के अचूक असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्याअर्थी पाऊस मुंबई आणि कोेकणात लवकर दाखल होत आहे, त्यानुसार राज्यातही यंदा वरूणराजा लवकर बरसणार आहे. यामुळे राज्यातील बळीराजाला देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

म्हणून पाऊस लवकर कोसळणार…

दरवर्षी नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास बंगालच्या उपसागरातून सुरू होतो आणि ते 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतात. त्यानंतर, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत 5 जूनपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचतात. महाराष्ट्रात साधारणतः 10 जूनपर्यंत मोसमी पावसाचे आगमन होते. मात्र, यंदा ही स्थिती बदलण्याची शक्यता आहे.

सरासरीपेक्षा जास्त पाऊस? 

यंदा राज्यात 105 टक्के पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. संपूर्ण मोसमी पावसाच्या काळात अल निनो निष्क्री असेल. तसेच, हिंदी महासागरीय द्वीध्रुवीयताही तटस्थ आहे. याव्यतिरिक्त, डिसेंबर ते मार्च या काळात युरेशिया आणि हिमालयात बर्फाच्छादित भाग सरासरीपेक्षा कमी राहिला आहे. या सर्व घटकांचा विचार करून भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त, म्हणजेच 105 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News