‘पोकळ दावे करण्याऐवजी…’, पहलगाम हल्ल्यावरून राहुल गांधींनी सुनावले

जम्मू कश्मीरमध्ये मागील पाच वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आला. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झालाची भीती व्यक्त केली जात आहे.

दिल्ली : जम्मू कश्मीरमध्ये मागील पाच वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आला. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झालाची भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ला करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील या हल्ल्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांन ट्विट करत म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी सरकारने आता जबाबदारी घेतली पाहिजे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत निंदनीय आणि हृदयद्रावक आहे.

ठोस पाऊल उचला

राहुल गांधींनी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांबाबत सहवेदना व्यक्त केली आहे.
संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट आहे, असे म्हटले आहे. तसेच सरकारने आता जबाबदारी घेतली पाहिजे आणि भविष्यात अशा क्रूर घटना घडू नयेत आणि निष्पाप भारतीयांना अशा प्रकारे आपले प्राण गमवावे लागू नयेत यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

धर्म विचारला आणि मारले

पर्यटकांनी सांगितले की जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केला. पर्यकांना दहशतवाद्यांनी धर्म कोणता आहे हे विचारले. हिंदू धर्म आहे असे सांगणाऱ्याला पर्यटकाला गोळी मारण्यात आली. कर्नाटकातून आलेल्या पर्यटक महिलेने सांगितले की ती दुपारी दीड वाजता पर्यकांनी हल्ला केला आणि तिच्या पतीला मारले.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News