हैद्राबाद : औरंगजेबाच्या कबरीवरू महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. कबरीला कायद्याने संरक्षण असल्याचे राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. कबरीचा वाद येवढा पेटला आहे की नागपूरमध्ये त्यावरू दंगल देखील झाली. मात्र, ज्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटला आहे त्याचे वंशज सध्या भारतात आहेत का? असा प्रश्न विचारला जातो आहे.

औरंगजेबाचे वंशज कोण आहे असा प्रश्न निर्माण होत असताना हैद्राबादचे प्रिन्स याकूब हबीब प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी हे पुढे आले आहेत. औरंगजेब हा आपला पूर्वज असल्याचा त्यांनी दावा केला असून ते मुघलांचे वंशज असल्याचे देखील सांगितले आहे.
प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांचे मते ते शेवटचा मुगल बादशहा मीर जाफर यांच्या सहाव्या पिढीतील आहेत. याकूब यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना देखील पत्र लिहले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, त्यांचे पूर्वज औरंगजेब यांची कबर संंभाजीनगर जिल्ह्यात आहे. ही कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. मात्र, भारतीय संविधानानुसार ही कबर हटवण्याचे कोणाला अधिकार नाहीत. राष्ट्रपतींनी राज्य सरकारला कबरीचे संरक्षण करण्याचे आदेश द्यावेत असे देखील याकूब यांनी पत्रात म्हटले आहे.
कबरीचा मी संरक्षक
याकूब यांनी दावा केला आहे की मुघलांच वंशज म्हणून ते या कबरीचे संरक्षक आहेत. औरंगजेबाची कबर ज्या खुलताबादमधील जागेवर आहे ती जागेची मालकी ही वक्फ बोर्डाची असून त्यावर केंद्र सरकारच्या पुरातत्वच्या अधिपत्त्याखाली आहे. आपले पूर्वज औरंगजेब हे भारतात जन्मले आणि भारतामध्येच त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे राज्यघटनेनुसार त्यांच्या कबरीला संरक्षण द्यावे.
लाल किल्ला, ताजमहलवर दावा
याकूब हे स्वतःसा मुघलांचे वंशज असल्याचे सांगत आहेतच तसेच त्यांनी मुघलांनी बांधलेल्या वास्तुंवर देखील आपली मालकी असल्याचे म्हटले आहे. याआधी याकूब यांनी दिल्लीतील लाल किल्ला तसेच आग्र्यातील ताजमहल हे आपल्या मालकीचे असल्याचा दावा करत न्यायालयामध्ये दाद मागितली होती.