मुंबई – मंगळवारी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यातील 16 पर्यटकांची ओळख पटली असून त्यांची नावं समोर आलेत. तर या सत्तावीस पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक असल्याची माहिती समोर येते. महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती येते. यातील तीन पर्यटक डोंबिवलीचे, एक पर्यटक पनवेलचा असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात एका भारतीय नौदलातील अधिकाऱ्याच्या दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. या अधिकाऱ्याचा 16 एप्रिल रोजी लग्न झालं होतं. आणि 22 एप्रिलला या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला.
हनिमूनसाठी काश्मीरला गेले होते…
दरम्यान, नौदलातील अधिकारी विनय नरवाल यांचे लग्न १६ एप्रिल रोजी झाले होते. ते कोचीमध्ये तैनात होते. गेल्या आठवड्यात विनय नरवाल यांचे लग्न झालं होतं. लग्नानंतर ते फिरण्यासाठी… आणि हनिमून करिता जम्मू-काश्मीरला गेले होते. परंतु तिथे त्यांना दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला. 16 एप्रिलला लग्न झाले आणि 22 एप्रिलला त्यांना जीव गमावावा लागला. लग्नानंतर एका आठवड्यातच या नौदलातील अधिकारी विनय नरवाल यांना जीव गमवावा लागल्यामुळे देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत असून, या मृत्यूमुळे सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे. लेफ्टनंट विनय नरवाल हे मूळचे हरियाणाचे होते. विनय नरवाल यांच्या पत्नीसमोरच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. तसेच दहशतवाद्यांनी धर्म विचारून हे काही जणांना मारले.

केंद्र सरकार सतर्क…
या हल्ल्यानंतर जगभरातून या हल्ल्याची निंदा आणि निषेध करण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. आणि या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. जगभरातील हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेचा भारतासोबत पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर हल्ल्यानंतर कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जम्मू कश्मीरमध्ये दाखल झाले असून, परिस्थितीचा आढावा घेताहेत. या हल्ल्याचा तपास एनआयए आजपासून करणार आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला असून, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संवाद साधला आहे.