मुंबई: इंडिया स्कील्सच्या रिपोर्टमधून महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. लोकांना नोकऱ्या देण्यात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. या यादीत दिल्ली दुसऱ्या स्थानी आहे. सर्वाधिक रोजगार पुण्यात असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. एमबीए पदविधारकांना सर्वाधिक नोकऱ्या मिळत आहेत. तर पगाराच्या बाबतीत केरळ राज्य आघाडीवर आहे. कामासाठी महिलांची सर्वाधिक पसंती आंध्रप्रदेश राज्याला मिळत आहे.
रोजगार देण्यात महाराष्ट्र अव्वल:
रोजगार उपलब्ध करून देण्याच्या यादीत महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. रोजगार उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्राची क्षमता 84 टक्के आहे. यात 78 टक्के रोजगार क्षमतेसह दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. इंडिया स्किल्स रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूसारखी राज्येन औद्योगिक आणि पायाभूत सुविधांमुळे रोजगारात आघाडीवर आहेत. महिलांना रोजगार देण्यात मात्र महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांत देखील नसल्याचे समोर आले आहे.

कामासाठी महिलांची ‘या’ राज्यांना पसंती?
महिलांना रोजगार देण्यात मात्र महाराष्ट्र तितका सक्षम ठरलेला नाही. आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात, तामिळनाडू या राज्यांत काम करण्यास महिला अधिक पसंती देत आहेत. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यातही वरील राज्य आघाडीवर आहेत. पुरूष देखील वरील राज्यात नोकरी करण्यास प्राधान्य देत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकाला पुरूषांची पसंती अधिक आहे.
या दरम्यान संगणक कौशल्यांमध्ये मात्र महाराष्ट्र काहीसा मागे पडल्या आहेत. हैदराबाद, गुंटुर, लखनऊ ही शहरे देखील लोकांना चांगल्या प्रमाणात रोजगार देत आहेत.
तरूणांची या शहरांना अधिक पसंती:
तरूणांची नोकरी आणि व्यवसायासाठी कोणत्या शहराला अधितक पसंती आहे, याबाबतची माहिती देखील इंडिया स्किल्स रिपोर्टमधून देण्यात आली आहे. यामध्ये आपल्या रोजगार क्षमतेच्या जोरावर पुणे शहर पहिल्या क्रमांकावर आहे.तर पाठोपाठ भारताची सिलिकॉन व्हॅली बंगळुरूचा क्रमांक लागतो. त्यानंतर पाठोपाठ मुंबई, त्रिशुर आणि दिल्ली या शहरांचा समावेश आहे.