‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणजे भोलेनाथ, जे मागाल ते देतात’, कैलास विजयवर्गीयांनी केलं कौतुक

या कार्यक्रमादरम्यान कैलास विजयवर्गीयांनी नितीन गडकरींचं तोंडभरून कौतुक केलं.

Kailash Vijayvargiya called Nitin Gadkari “Bholenath” : मध्य प्रदेशच्या दौऱ्यात केंद्रीय रस्ते आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचं मध्य प्रदेशचे कॅबिनेटमंत्री कैलास विजयवर्गीय यांनी तोंडभरुन कौतुक केलंय. नितीन गडकरी हे भोलेनाथ आहेत, त्यांच्याकडे जे मागाल, ते मिळतं, असं विजयवर्गीय म्हणाले आहेत. मध्य प्रदेशात धार जिल्ह्यात बदनावरमध्ये लोकार्पणाच्या आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गडकरी उपस्थित होते.

बदनावरमध्ये 5800 कोटींपेक्षा जास्त रुपये खर्चून 328 किलोमीटर लांबीच्या 10 रस्त्यांच्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, कॅबिनेट मंत्री राकेश सिंह, कैलास विजयवर्गीय यांच्यासह अनेक मंत्री आणि आमदार उपस्थित होते.

नितीन गडकरी हे ‘भोलेनाथ’

या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी नितीन गडकरी यांचं स्वागत केलं. आपल्या भाषणात विजयवर्गीय म्हणाले की, नितीन गडकरी हे देशातील लोकप्रिय नेते आहे, गडकरी केवळ नेतेच नाहीत तर संपूर्ण देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलण्याचं श्रेयही गडकरींना जातं. गडकरी हे भोलेनाथ आहेत. त्यांच्याकडे मागणी केली, की ती मागणी ते पूर्ण करतात. अशा भोलेनाथ नितीन गडकरींचं या कार्यक्रमात मी जोरदार स्वागत करतो.

अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीनंतर चित्रकुटमध्ये वाढले पर्यटक

केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे मध्य प्रदेशच्या होत असलेल्या विकासाचा मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी आवर्जून उल्लेख केला. अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीनंतर, चित्रकूटमधील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव त्या ठिकाणी चित्रकूट लोक प्रकल्पाची निर्मिती करतायेत, असंही विजयवर्गीय त्यांच्या भाषणात म्हणाले.


..तर आम्ही कृतज्ञ राहू

चित्रकूट लोकबाबत बोलताना विजयवर्गीय भाषणात म्हणाले की, सतनाचा प्रभारीही मी आहे, माझी इच्छा आहे की सतना ते चित्रकूटपर्यंत महामार्गाची निर्मिती व्हायला हवी. या रस्त्याला जर गडकरींनी मान्यता दिली तर आम्ही सर्वजणं तुमचे कृतज्ञ राहू.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले की, मध्य प्रदेशला ही भेट देण्यासाठी, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोघांचेही देशवासियांच्या वतीनं आभार मानतो.


About Author

Smita Gangurde

Other Latest News