शेतकऱ्यांसाठी खूशखबर, 14 पिकांच्या MSP मध्ये सरकारकडून वाढ, उत्पादन खर्चाच्या दीडपट पैसे मिळणार

सरकार दरवर्षी कृषी खर्च आणि  किंमत आयोगाच्या शइफारसीनुसार किमान आधारभूत किंमत निश्चित करतं. शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाचं संरक्षणाचं  काम एमएसपीतून होत असतं.

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या  बैठकीत देशातील शैतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. कापूस, सोयाबिन, धान आणि तुरीसह 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत म्हणजेच एमएसपीत वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. पिकाच्या खर्चापेक्षा किमान आधारभूत किंमत 50 टक्के जास्त असेल, अशा  रितीनं हा निर्णय घेण्यात आल्या माहिती केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळं नुकसानीनं पिचलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कोणत्या 14 पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ?

1. धान –  जुना एमएसपी- 2300 रुपये
नवा एमएसपी- 2369 रुपये
वाढ- 69 रुपये

2. धान ए ग्रेड – जुना एमएसपी- 2320 रुपये
नवा एमएसपी- 2389 रुपये
वाढ- 69 रुपये

3. ज्वारी हायब्रिड – जुना एमएसपी- 3371 रुपये
नवा एमएसपी- 3699 रुपये
वाढ- 328 रुपये
4. ज्वारी मालदंडी – जुना एमएसपी- 3421 रुपये
नवा एमएसपी- 3749 रुपये
वाढ- 328 रुपये
3. बाजरी – जुना एमएसपी- 2625 रुपये
नवा एमएसपी- 2775 रुपये
वाढ- 150 रुपये
4. नाचणी – जुना एमएसपी- 4290 रुपये
नवा एमएसपी- 4886 रुपये
वाढ- 596 रुपये
5. मका – जुना एमएसपी- 2225 रुपये
नवा एमएसपी- 2400 रुपये
वाढ- 175 रुपये
6. तूर – जुना एमएसपी- 7550 रुपये
नवा एमएसपी- 8000 रुपये
वाढ- 450 रुपये
7. मूग- जुना एमएसपी- 8682
नवा एमएसपी- 8768
वाढ- 86
8. उडीद – जुना एमएसपी- 7400 रुपये
नवा एमएसपी- 7800 रुपये
वाढ- 400 रुपये
9. भुईमूग – जुना एमएसपी- 6783 रुपये
नवा एमएसपी- 7263 रुपये
वाढ- 480 रुपये
10.सुर्यफूल – जुना एमएसपी- 7280 रुपये
नवा एमएसपी- 7721 रुपये
वाढ- 441 रुपये
11. सोयाबीन- जना एमएसपी- 4891
नवा एमएसपी- 5328
वाढ- 436
12. तीळ – जुना एमएसपी- 9267 रुपये
नवा एमएसपी- 9846 रुपये
वाढ- 579 रुपये
13. कापूस मिडल – जुना एमएसपी- 7121 रुपये
नवा एमएसपी- 7710 रुपये
वाढ- 589 रुपये
14. कापूस लाँग – जुना एमएसपी- 7521 रुपये
नवा एमएसपी- 8110 रुपये
वाढ- 589 रुपये

एमएसपी म्हणजे नेमकं काय?

शेतकरी पिकवत असलेल्या मालाचा किमान भाव सरकार दरवर्षी निश्चित करतं. त्या पिकांचा भाव बाजारात कमी असेल तरी सरकार या किमान आधरभूत किमतीला हे धान्य शेतकऱ्यांकडून खरेदी करते. यामुळे पिकांच्या किंमतीतील चढ उतारांचा  परिणाम शेतकऱ्यांवर होत नाही.

किती धान्यांना एमएसपी लागू?

एकूण 23  धान्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ होतो.
1. 7 धान्य- गहू, मका, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी  आणि जव

2. 5 डाळी- हरबरा, तूर, उडीद, मूग आणि मसूर

3. 7 तेलबिया- शेंगदाणे, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ,करडई, काजू आणि  मोहरी

4. 4 व्यावसायिक पिकं- कापूस, ऊस, कच्चा ताग, सुकं खोबरं


About Author

Smita Gangurde

Other Latest News