गाझियाबाद : दिल्लीजवळील गाझियाबादमध्ये हत्या आणि आत्महत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने आधी आपल्या बायकोला मारू तिची हत्या केली त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तिचे नाव कुलदीप त्यागी आहे.
हत्या आणि आत्महत्येमागचे कारण समोर आले आहे. कुलदीप त्यागी यांना कँन्सर झाला होता. त्यावरील उपचारामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतून याचा खुलासा झाला आहे.

बायकोला मारली गोळी…
कुलदीप यांनी आपल्या पत्नीला गोळी मारण्यामागचे कारण दिले आहे. आपण आणि पत्नीने एकत्र जगण्याची आणि एकत्र मरण्याची शपथ घेतली होती. आपल्या उपचारावर पैसे खर्च होऊ नयेत म्हणून त्यांनी पत्नीला मारले आणि स्वतः आत्महत्या केली.
कँन्सर रुग्णांमध्ये वाढ
मागील काही वर्षांमध्ये गाझियाबादमध्ये कँन्सर रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. प्रदुषण, तंबाखू सेवन आणि जीवनशैलीतील बदलामुळे कँन्सर रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. तोंडाचा आणि फुफ्फुसाचा कँन्सर होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. प्रदुषणामुळे फुफ्फुसाचे विकास बळावत आहेत.