सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, शिमल्यातील आयजीएम रुग्णालयात दाखल

सोनिया गांधी शिमल्याला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी सुट्टीसाठी शिमलाला गेल्या होत्या. येथे त्यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्यांना तातडीने आयजीएमसी शिमलाला घेऊन जाण्यात आलं. येथे त्यांना स्पेशल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांची ईसीजी आणि एमआयआरदेखील केलं आहे.

मुख्य सचिव प्रबोध सक्सेनादेखील आयजीएमला पोहोचले आहेत. सोनिया गांधी सोमवारी सुट्टीसाठी शिमलाला गेल्या होत्या. येथे त्या मुलगी प्रियांका वाड्रा यांच्या छराबडा स्थित घरी थांबल्या होत्या.

डॉक्टरांकडून तपासणी सुरू…

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना काही किरकोळ आरोग्य अडचणी उद्भवल्यामुळे आरोग्य तपासणीसाठी शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आणण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जात आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्‍यांचे प्रमुख सल्लागार नरेश चौहान यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री सुक्खू शिमलासाठी रवाना…

राज्यसभा सदस्य सोनिया गांधी शनिवारी आयजीएमसीला पोहोचल्या. येथे त्यांना रेडिओलॉजी विभागात नेण्यात आलं. येथे त्यांच्यावर एमआयआर केलं जात आहे. यादरम्यान आरोपी मंत्रीही आयजीएमसीला पोहोचले आहेत. याशिवाय सरकारमधील अन्य लोकही रुग्णालयात पोहोचले आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू आपस्या दोन दिवसीय ऊना दौरा मध्येच सोडून शिमल्याला रवाना झाले आहेत.

 

 

 

 

 

 

 


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News