Housefull 5 Box Office Collection Day 2 : अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख यांच्या हाऊसफुल फ्रँचायझीतील नवीन चित्रपट ‘हाऊसफुल 5’ 6 जून रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी धुमाकूळ घालत या वर्षातील तिसरी सर्वात मोठी ओपनिंग घेतली आहे. आता दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे.
ही कॉमेडी फिल्म बॉक्स ऑफिसवर मोठा प्रभाव दाखवत आहे. तर उशीर न करता पाहूया की दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली आहे आणि एकूण कलेक्शन किती झाले आहे.

‘हाऊसफुल 5’ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी अधिकृत आकड्यांनुसार 24.35 कोटी रुपये कमावले. तर Sacnilk च्या अंदाजानुसार दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8:05 पर्यंत 19.61 कोटी रुपये कमावले आहेत. अशा प्रकारे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 43.96 कोटी रुपये झाले आहे. हे आकडे अंतिम नाहीत आणि यात बदल होऊ शकतो.
‘हाऊसफुल 5’ ने मोडले या वर्षातील 14 चित्रपटांचे रेकॉर्ड
‘हाऊसफुल 5’ ने केवळ छावा, सिकंदर, स्काय फोर्स, केसरी 2, रेड 2, जाट आणि भूल चूक माफ या चित्रपटांना वगळता, या वर्षात रिलीज झालेल्या इतर सर्व 14 बॉलिवूड चित्रपटांचे लाइफटाईम कलेक्शन केवळ दोन दिवसांत पार केले आहे.
या 14 चित्रपटांची यादी पुढीलप्रमाणे आहे – आझाद, इमर्जन्सी, मेरे हस्बैंड की बीवी, फतेह, लवयापा, चिडीया, सुपरबॉयज ऑफ मालेगाव, क्रेझी, बॅडअॅस रविकुमार, कंपकंपी, केसरी वीर, फुले, द डिप्लोमॅट आणि देवा.
या सर्व चित्रपटांमध्ये देवा (33.9 कोटी रुपये) आणि द डिप्लोमॅट (38.97 कोटी रुपये) यांनी सर्वाधिक कमाई केली होती, पण ‘हाऊसफुल 5’ ने फक्त दोन दिवसांत त्यांचाही रेकॉर्ड मोडला आहे.
‘हाऊसफुल 5’ चे बजेट आणि वर्ल्डवाइड कमाई
Sacnilk नुसार, 225 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपटाने पहिल्याच दिवशी वर्ल्डवाइड 40.75 कोटी रुपये कमावले. आजच्या कमाईसह हे आकडे 50 कोटी रुपये पार करतात.
या चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे कारण ही अक्षय कुमारच्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक वर्ल्डवाइड स्क्रीन्स मिळालेली फिल्म आहे. याला 85 देशांमधील 1300 ठिकाणी 2000 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आले आहे.