IRCTC धडाधड खाती बंद करत आहे, आत्ताच हे काम करून घ्या नाहीतर ना तिकीट बुक होईल, ना अकाऊंट राहील

जर तुम्ही IRCTC च्या माध्यमातून तिकीट बुक करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक मोठी बातमी आहे. IRCTC ने अलीकडेच AI चा वापर करून 2 कोटी अकाउंट बंद केले आहेत. जर तुम्हाला तुमचं अकाउंट बंद सुरु ठेवायचं असेल, तर त्वरित तुमचं आधार कार्ड IRCTC अकाउंटसोबत लिंक करा. असं न केल्यास तुम्ही तिकीट बुक करू शकणार नाही, आणि तुमचं IRCTC खातं देखील बंद होऊ शकतं.

जर तुम्हाला IRCTC खात्याशी आधार कार्ड कसं लिंक करायचं हे माहित नसेल, तर आम्ही तुम्हाला एकेक स्टेपमध्ये ते समजावून सांगणार आहोत.

 कोणती खाती झाली बंद

IRCTC ने हा निर्णय त्या लोकांच्या मदतीसाठी घेतला आहे, जे Tatkal आणि Premium Tatkal तिकिटं बुक करतात. रेल्वेने अशा खात्यांची ओळख पटवली आहे, जे बॉट्स किंवा ऑटोमेटेड टूल्सचा वापर करून ऑनलाइन तिकिटं बुक करतात. रेल्वेसाठी एक खास AI टूल तयार करण्यात आलं आहे, ज्याच्या मदतीने गेल्या 6 महिन्यांत 2.4 कोटी खाती बंद करण्यात आली आहेत. IRCTC चा निर्णय आहे की जे खाते आधार व्हेरिफाइड नाहीत त्यांची सखोल चौकशी होईल. कोणतीही त्रुटी आढळल्यास ती खाती कायमची बंद केली जातील. IRCTC च्या एकूण 13 कोटी खात्यांपैकी फक्त 1.2 कोटी खातीच आधार व्हेरिफाइड आहेत. तत्काल तिकिटासाठी आधार आवश्यक रेल्वेने अलीकडेच तात्काळ तिकिट बुक करताना आधार ओळख पटवणी (ऑथेंटिकेशन) आवश्यक केले आहे. ज्या लोकांचे आधार कार्ड त्यांच्या IRCTC खात्याशी लिंक आहे, त्यांना तात्काळ तिकिट बुक करताना 10 मिनिटांचा अधिक वेळ दिला जाईल. या दरम्यान अधिकृत एजंट्सना तिकिट बुक करण्याची परवानगी दिली जाणार नाही. यामुळे नियमित प्रवाशांसाठी आधार व्हेरिफिकेशन आणखीनच गरजेचं बनलं आहे.

असं करा लिंक

तुमचं IRCTC अकाउंट आधार कार्डशी लिंक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  • IRCTC ची अधिकृत वेबसाइट www.irctc.co.in वर जा
  • तुमचं युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा
  • ‘My Account’ वर जा आणि वर उजव्या कोपऱ्यात क्लिक करा
  • ‘Link Your Aadhaar’ हा पर्याय निवडा
  • आधार कार्डमध्ये जसं नाव आणि नंबर आहे तसंच टाका
  • तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल, तो टाका आणि व्हेरिफाय करा
  • ‘Update’ बटणावर क्लिक करा, वेरिफिकेशन पूर्ण होईल
  • त्यानंतर स्क्रीनवर कन्फर्मेशन मेसेज येईल आणि तुमचं अकाउंट आधारशी लिंक होईल.

About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News