ज्या हाताने लेकीला जेवू घातलं, त्याच हाताने गळा दाबला; बाप-लेकीच्या प्रेमाचा भयंकर शेवट

बापान ज्या हाताने लेकीला लहानपणी जेऊ घातलं, हात धरून चालायला शिकवलं...त्याच हाताने लेकीचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली.

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातून ऑनर किलिंगचा एक थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. बापान ज्या हाताने लेकीला लहानपणी जेवू घातलं, हात धरून चालायला शिकवलं…पाटीवर पहिली अ आ ई गिरवण्यास शिकवली, त्याच बापाने आपल्या स्वत:च्या हाताने लेकीचा गळा दाबून खून केला. बापाने लेकीची हत्या करीत तिचा मृतदेह घरात लपवून ठेवला. या मुलीला प्रेम केल्याची अशी भयावह शिक्षा मिळाली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील मोहिउद्दीननगर पोलीस ठाणे हद्दीतील आहे. मुलगी प्रेम प्रकरणातून घरातून निघून गेली होती. मात्र तिच्या वडिलांना मुलीचं प्रेमप्रकरण आवडलं नव्हतं. शेवटी बापाने मुलीला विश्वासात घेऊन दिल्लीला बोलावलं. मुलगी घरी आल्यानंतर तिचा गळा दाबून हत्या केली. मुलीचा मृतदेह घरातील बाथरूममध्ये बंद करून ठेवला. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

बापाने लेकीला संपवलं…

7 एप्रिल रोजी या नराधम बापाने लेकीची हत्या करीत तिचा मृतदेह बाथरूममध्ये बंद करून ठेवला. बुधवारी 9 एप्रिल रोजी रात्री उशीरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. ऑनर किलिंगच्या या प्रकरामुळे परिसरातून संताप व्यक्त केला आहे. मृत मुलीचं नाव साक्षी सिंह (25 वर्षे) आहे. ती सज्ञान होती. मात्र बापाने मुलीचं प्रेमप्रकरण आवडलं नाही आणि ती पळून गेल्यामुळे समाजात आपलं नाक कापलं गेलं ही भावना बापामध्ये बळावली. शेवटी त्यांनी पोटच्या लेकीलाच संपवलं. पोलिसांनी या प्रकरणात मुलीच्या वडिलांना अटक केलं आहे.

मार्च महिन्यात प्रियकरासोबत निघून गेली होती…

4 मार्च रोजी साक्षी शेजारील गावातील एका तरुणासोबत प्रेम प्रकरणातून निघून गेली होती. मात्र सामाजिक दबावामुळे मुलीला दिल्लीला बोलवण्यत आलं. त्यानंतर एक आठवड्यापूर्वी मुलीला दिल्लीहून मोहिउद्दीननगर येथे आणण्यात आलं होतं. यादरम्यान मुलगी पुन्हा गायब झाली होती. याबाबत मुलीच्या आईने साक्षीच्या वडिलांना याबाबत विचारलं तर त्यांनी ती पुन्हा परतल्याचं सांगितलं. यानंतर मृत मुलीच्या आईने आपली बहीण आणि त्यांच्या पतीला घडलेला प्रकार सांगितला आणि हत्येची भीती व्यक्त केली. शेवटी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला. घराचा तपास केला असता घराच्या मागच्या बाजूला बाथरूमला टाळं दिसलं. दार उघडलं तर साक्षीचा मृतदेह बाथरूममध्ये आढलला. मृतदेहातून दुर्गंधी येत होती.


About Author

Smita Gangurde

Other Latest News