X Money : एलोन मस्क त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X मध्ये पेमेंट फीचर जोडणार आहेत. या फीचरद्वारे, युजर्स त्यांच्या X अॅपवरून डिजिटल पेमेंट करू शकतील. कंपनी या फीचरवर बऱ्याच काळापासून काम करत होती. निवडक युजर्ससाठी त्याचे बीटा व्हर्जन रोल आउट करण्यात आले आहे.
एलोन मस्क यांनी त्यांच्या X प्लॅटफॉर्मला एव्हरिथिंग अॅप म्हणून विकसित करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. युजर्स आता X द्वारे कॉलिंग, व्हिडिओ शेअरिंग, लाईव्ह व्हिडिओ यासारख्या फीचर्सचा आनंद घेऊ शकतात. पेमेंट फीचर जोडल्यानंतर, हे अॅप एका सुपरअॅपसारखे काम करेल.
बीटा वर्जन लॉन्च
Tesla आणि SpaceX चे CEO एलन मस्क यांनी काही काळापूर्वी त्यांच्या अधिकृत हँडलवरून X Money फिचरची टीझर दिली होती. एका X यूजर @teslaownerssv ने दावा केला आहे की X Money लवकरच रोल आउट होणार आहे. हे बँकिंग आणि पेमेंट सेवा यापेक्षाही मोठे ठरू शकते. मस्क यांनी या यूजरच्या पोस्टवर स्पष्ट केले आहे, की हा फिचर आधी मर्यादित बीटा यूजर्ससाठी जारी करण्यात आला आहे. यामध्ये लोकांची बचत रक्कम असते, त्यामुळे रोल आउट करण्यापूर्वी आवश्यक काळजी घेतली जात आहे.

बिटकॉइन खरेदी देखील करता येणार
रिपोर्टनुसार, एलन मस्क यांचा X Money फिचर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे क्रिप्टोकरन्सी ट्रान्झॅक्शनसाठी वापरला जाऊ शकतो. भविष्यात याच्या माध्यमातून बिटकॉइन खरेदी देखील करता येणार आहे. हे फिचर २०२५ च्या अखेरीस रोल आउट केला जाऊ शकतो.
या वर्षाच्या सुरुवातीला, X च्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी त्यांच्या अधिकृत हँडलद्वारे सांगितले होते, केले की युजर्स त्यांच्या X मनी खात्यात व्हिसा कार्ड जोडू शकतात आणि वॉलेट त्वरित रिचार्ज करू शकतात. याशिवाय, वापरकर्ते त्यांचे डेबिट कार्ड त्यात जोडून P2P पेमेंट करू शकतील. इतकेच नाही तर युजर्स X मनी वॉलेटमधून त्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर देखील करू शकतील.
हे फिचर सध्या निवडक बीटा युजर्ससाठी आणण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, हे फिचर कसे कार्य करेल हे चाचणीनंतरच कळेल. तथापि, अहवालांनुसार, एलोन मस्कचे हे X मनी फिचर GPay सारखे देखील कार्य करेल, ज्यामध्ये युजर्स त्यांचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड जोडू शकतात. तसेच, त्याद्वारे संपर्करहित पेमेंट देखील केले जाऊ शकते.