धन्यवाद मोदीजी! नव्या वक्फ कायद्यासाठी दाऊदी बोहरा समाजाने मानले आभार, शिष्टमंडळाने घेतली भेट

वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात तब्बल 70 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांमध्ये असुद्दीन औवेसी, मनोज कुमार झा, मोईत्रा महापात्रा यांच्या देखील याचिकांचा समावेश आहे.

दिल्ली :  नव्या वक्फ कायद्याासाठी दाऊदी बोहरा समाजाच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट त्यांचे आभार मानले. शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले की, वक्फ कायद्यात सुधारणा व्हावी ही आमची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी होती ती पंतप्रधान मोदींनी पूर्ण करून त्यांच्यावरील आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सबका साथ सबका विकास या घोषणेप्रमाणेच त्यांची निती आहे, असे शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगत या नितीवर आपला विश्वास दाखवला. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेला निर्णय हा सर्वसमाज घटकांचे प्रगतीचा मार्ग दाखवतो. पंतप्रधान मोदींनी देखील बोहरा समाजाच्या शिष्टमंडळाशी संवाद साधत राष्ट्रनिर्मितीमध्ये बोहरा समाजाच्या योगदाने कौतुक केले. तसेच सरकार सर्वच समाजघटाकांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

वक्फ विरोधात आंदोलन

नवीन वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाले. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रुपांतर देखील झाले. मात्र, देशाच्या काही भागामध्ये या कायद्याच्या विरोधात अजुनही आंदोलन केले जात आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या कायद्यातील दोन तरतुदींना स्थगिती दिली आहे. चार मे रोजी यावर सुनावणी होणार आहे.

कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान

वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात तब्बल 70 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांमध्ये असुद्दीन औवेसी, मनोज कुमार झा, मोईत्रा महापात्रा यांच्या देखील याचिकांचा समावेश आहे. कोर्टाने कायद्यातील काही तरतुदींविषयी नाराजी व्यक्त केली. विशेषता वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम सदस्यांच्या नियुक्तीबाबत सरकारला प्रश्न केला. हिंदू धार्मिक ट्र्स्टवर मुस्लिमांची नियुक्ती अशा प्रकार केली जाईल का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News