मुंबई – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. अनेक देशातून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूवर मोठ्या प्रमाणात आयात कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात ट्रम्प यांच्यावर अनेक देशातून टीका होत असताना, आता चीननेही ट्रम्पच्या धोरणा विरोधात संताप व्यक्त केला असून, अमेरिकेसोबत लढण्यासाठी भारताकडे मदत मागितली आहे.
चीनवर 104% करामुळे चीनचा संताप…
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयात वस्तूवर अभूतपूर्व असा 104% कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनचा तिळपापड झालेला आहे. तिकडे भारत आणि अमेरिका यांच्यात जागतिक बाजारपेठ होणारी उलाढाल आणि दोन्ही देशातील आयात-निर्यात आणि आर्थिक व्यवहार याबाबत चर्चा सुरू आहे. परंतु चीन हा नेहमीच भारतावरती कुरघोडी करत असतो. भारताच्या सीमा आहेत तिथून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र आता अमेरिकेने टेरिफच्या माध्यमातून 104 टक्के कर लावल्यानंतर चीनचा संताप झाला असून, चीनने भारताकडे मदत मागितली आहे.

चीनची भारताकडे मदतीसाठी धाव…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफच्या माध्यमातून आयात कर याच्यात वाढ केलेली आहे. या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अनेक देशांना धक्का बसला आहे. भारतातून ज्या वस्तू अमेरिकेत जातात त्याच्यावर 26 टक्के कर आहे, पण कर कमी करण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला आहे. तसेच चीनच्या बीजिंगमध्ये 34% कर चीने मागे घ्यावा, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिला आहे. चीनवर 104% कर लावल्यानंतर चीनचा संताप झाला असून, अमेरिकेच्या या टेरिफ धोरणा विरोधात भारत आणि चीन यांनी एकत्रपणे लढाई लढू या. आणि याचा सामना करूया. असे चीनने म्हटले आहे. याकरिता चीनने भारताकडे एकत्र ही लढाई लढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु चीनच्या या मागणीनंतर भारत कोणती भूमिका घेते? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.