कोलकाता : पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते, माजी खासदार दिलीप घोष लग्न बंधनात अडकणार आहेत. विशेष म्हणजे वयाच्या 61 व्या वर्षी घोष यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्येच कार्यकर्ते असलेल्या महिला कार्यकर्त्या रिंकु मजूमदार यांच्यासोबत ते लग्नगाठ बांधणार आहेत.
भाजपमध्ये सक्रिय असलेले दिलीप घोष हे आक्रमक नेत म्हणून परिचित आहेत. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्षपद देखील भूषवले आहे. ते पहिल्यांदा 2016 मध्ये आमदार म्हणून विजयी झाले होते. 2019 च्या निवडणुकीत ते खासदार झाले. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला.

रिंकू मुजूमदारसोबत अशी झाली भेट
रिंकू मजमूदार हे घटस्फोटीत आहेत. एका सार्वजनिक कार्यक्रमात दिलीप घोष यांची त्यांच्यासोबत भेट झाली. रिंकू यांना राजकारणात येण्यासाठी दिलीप घोष यांनीच प्रोत्साहित केले. रिंकू यांनी भाजपच्या ओबीस महिला आघाडीच्या पदाधिकारी म्हणून काम देखील केले आहे.
पराभवानंतर आधार
रिंकू या अनेक वर्षांपासून घोष यांच्यासोबत काम करत आहेत. 2024 मध्ये दिलीप घोष हे पराभूत झाल्यानंतर ते खचले होते त्यावेळी रिंकू यांनी त्यांना आधार दिला. रिंकू यांनीच दिलीप यांना लग्नासाठी प्रोपोज केला.दिलीप यांनी प्रथम नकार दिला मात्र रिंकू यांनी दिलीप यांच्या आईशी बोलून दिलीप यांना लग्नासाठी तयार केले.
सोशल मीडियावर स्वागत
रिंकू मजूमदार आणि दिलीप घोष यांच्या लग्नाविषयी मीडियातून बातम्या प्रसिद्ध होताच त्याचे नेटिझन्सने स्वागत केले. राजकीय व्यकीला देखील खासगी आयुष्य असते त्यांना देखील आधाराची गरज असते, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत होत्या.