महिला आणि गुंतवणुकदारांचा जीवाभावाचा साथीदार म्हणजे सोनं. गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. आज तर सोन्याच्या दराने एक लाखांचा टप्पा पार केला. आज 10 ग्रॅम सोनं जीएसटीसह 1 लाख 1 हजार 400 पर्यंत पोहोचलं आहे. 22 एप्रिलपर्यंत या किमतीत अधिक वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोन्याच्या दर वाढीमागे चीन आणि अमेरिकेत सुरू असलेलं वैश्विक तणाव मानलं जात आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याची किमत 99,800 रुपये प्रतितोळं पोहोचलं आहे. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 1650 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढली आहे. सराफा बाजार म्हणजे All India Sarafa Association मध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव 99,800 रुपये प्रति 10 ग्रॅम (जीएसटीशिवाय) आहे.

तर एमसीएक्समध्ये दुपारी 4.42 वाजता 24 कॅरेट सोन्याचे भाव 96,696 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे. एमसीएक्सच्या Future gold मध्ये सोन्याचे भाव 96,726 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत नोंदविण्यात आला आहे.
सोन्याचे दर का वाढतायेत?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफमध्ये 90 दिवसांसाठी निर्बंध आणले आहे. अद्याप यावर पूर्णपणे बंदी आणण्यात आलेली नाही. त्याशिवाय चीन आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या टॅरिफ वॉरमुळे वैश्विस चिंता वाढली आहे. ज्यामुळे गुंतवणुकदार सावधपणे गुंतवणूक करीत असल्याचं दिसत आहे.
चांदीच्या किमतीतही वाढ..
सोमवारी सोन्यासह चांदीच्या किमतीतही वाढ पाहायला मिळत आहे. चांदीच्या किमतीत 500 रुपयांनी वाढ झाली आहे. आणि एक किलो चांदीची किमत 98,500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. शुक्रवारी चांदीची किंमत 98,000 रुपये प्रति किलोवर स्थिर होती.