मुंबईत 11 लाख वाढलेले मतदार कोणाला कौल देणार? नवीन मतदार यादीत 1 लाख मतदार वाढण्याची शक्यता

जवळपास दहा लाख मतदार वाढल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आता सहा महिन्यात पन्नास हजार एक लाखच्या आसपास नवतदार वाढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे हे वाढलेले मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार? कोणाच्या मत देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.

New Voters – काही दिवसांपूर्वी राज्यातील रखडलेल्या पालिका निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग पालिका निवडणुकीसाठी तयारीला लागले असून, प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला पत्र पाठवला आहे. त्यामुळे पालिका निवडणुका पुढील चार महिन्याच्या आत होण्याची शक्यता असताना, आता राजकीय पक्षाकडूनही मोर्चेबांधणी केली जात आहे. आता प्रभाग निहाय मतांचे समीकरण आणि पक्ष बलाबल याचा विचार केला जात आहे. यातच आता विधानसभा निवडणुकीत १० ते ११ लाख वाढलेले मतदार कोणाच्या बाजूनी कौल देणार? त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नव मतदार ठरणार महत्वाचे…

दरम्यान, 2017 रोजी पालिका निवडणूक झाली होती. त्यावेळी 91 लाख 80 हजार 653 एवढी मतदारांची संख्या होती. म्हणजे मुंबईतील प्रत्येक प्रभागात साधारण ५० हजार लोकसंख्या आहे. आता प्रभाग रचना 227 राहणार आहे. मात्र प्रभागात वाढलेले मतदार हे एखाद्या पक्षाला किंवा उमेदवाराला कलाटणी देणारे ठरू शकतात. जवळपास दहा ते अकरा लाख मतदार वाढले आहेत. नुकत्याच विधानसभा निवडणुका सहा महिन्यापूर्वी पार पडल्या होत्या. यात जवळपास दहा लाख मतदार वाढल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आता सहा महिन्यात पन्नास हजार एक लाखच्या आसपास नवतदार वाढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे हे वाढलेले मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार? कोणाच्या मत देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.

मुंबईत विधानसभा निवडणुकीत मतदार किती होते?

दुसरीकडे सहा महिन्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळी मतदार यादी अद्यावत करण्यात आली होती. तेव्हा मुंबईतील १ कोटी २ लाख 29 हजार 708 एवढे मतदार संख्या होती. म्हणजेच 2017 च्या तुलनेत आठ वर्षात दहा ते अकरा लाख एवढे मतदार वाढलेले आहेत. तसेच आता निवडणुका होऊन सहा महिने झाले आहेत. या सहा महिन्यात पन्नास हजार ते एक लाख मतदान वाढल्याचे सांगण्यात येत आहे. हे नव मतदार एखाद्या उमेदवाराला किंवा त्या पक्षाला कलाटणी देणारे ठरू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News