चाकणकर कोण रश्मिका मंदाना आहेत की, स्मृती ईराणी आहेत? सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

राज्य महिला आयोगावर बोलल्यावर किंवा टीका केल्यानंतर काही लोकांना प्रसिद्ध मिळते, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. याचा सुषमा अंधारेनी जोरदार समाचार घेतला.

Sushma Andhare – राज्यातील महिलांच्या विविध प्रश्नाबाबत मविआच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली. जे महिलांचे प्रश्न आहेत. त्याबाबत मी राज्य महिला आयोगाला बोलावून त्यांना विचारून असं राज्यपालंनी आम्हाला आश्वासन दिले आहे, असं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी सांगितले. मात्र यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

रुपाली चाकणकर कोण आहेत?

दरम्यान, रूपाली चाकणकर कोण आहेत? कोण आहेत चाकणकर? रूपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का? की रूपाली चाकणकर स्मृती ईराणी आहेत? की ज्यांच्यावर बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळते. चाकणकर ह्या कोणत्या क्षेत्रातील सुप्रिमो आहेत? राजकारण, बॉलिवूड, प्रशासन? मला वाटतंय हा त्यांचा गैरसमज आहे. आणि लवकरात लवकर या अंधश्रद्धेतून त्यांनी बाहेर पडावं, असा टोला सुषमा अंधारेंनी रूपाली चाकणकर यांना लगावला.

राज्यात महिलांचे अनेक प्रश्न…

दरम्यान, पुण्यातील हगवणे प्रकरणात जो राजकीय हस्तक्षेप आहे. जी मागासवर्गीय मंडळ आहेत. जी वंचित घटकासाठी आहेत. त्यांचा निधी कुठेही वर्ग होऊ नये, पुण्यात बार अनधिकृतपणे सुरू आहेत, याचा त्रास महिलांना होतोय. राज्यातील वाढते ड्रग्स, पुण्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत, यासह राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसवी, अशा महिला अध्यक्षा असाव्यात अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली, असं सुषमा अंधारे यांनी सांगितले.

त्यांना कायद्याची जाण नाही…

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या की, राज्य महिला आयोगाच्या महिला अध्यक्ष यांना कायद्याची परिघ माहीत असेल, असा अध्यक्ष असावा… त्यांना कायद्याचे ज्ञान असावे…, कायद्याची बाजू माहिती असावी. रूपाली चाकणकर यांना कोणत्याही कायद्याची बाजू माहित नाही. कायद्याचे ज्ञान नाही. साधा ते ईमेल पाठवू शकत नाहीत. पुण्यातील हगवणे प्रकरण हे सीआयडीकडे सोपविण्यात यावे. तसेच राज्य महिला आयोगात सदस्यांची जी पदं रिक्त आहेत, ती पदं भरण्यात यावीत, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केल्याचं सुषमा अंधारेंनी सांगितले.


About Author

Astha Sutar

Other Latest News