मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सनदी अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरुच आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा धुरा हाती घेतल्यापासून मुख्यमंत्र्यांनी मोठे फेरबदल शासकीय अधिकारी आणि सनदी अधिकाऱ्यांमध्ये दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरुच आहे. आज मंगळवारी पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पाच सनदी अधिकारी कोण?
दरम्यान, राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरु असून मंगळवारी पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अस्तिक कुमार पांडे यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ज्वाईट कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर रमेश चव्हाण यांची राज्य कामगार कामगार विमा योजनेचे आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. तर सत्यम गांधी यांची सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. तर विशाल खत्री यांची नेमणूक प्रकल्प अधिकारी डहाणू येथे केली आहे. आणि राहुल गुप्ता यांची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादीतचे सहव्यवस्थापक , म्हणून छत्रपती संभाजी नगर येथे बदली करण्यात आली आहे.

फडणीसांच्या काळात खांदेपालट…
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवालय कार्यालयात मुख्य सल्लागार म्हणून प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी हे फडणवीसांचे अगदी जवळचे संबंध आहेत. तसेच त्यांनी फडणवीसांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात परदेशी यांनी काम पाहिले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा धुरा सांभाळल्यापासून सनदी अधिकारी यांच्या बदल्यामध्ये मोठे फेरबदल दिसून येताहेत. आज पुन्हा एकदा पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या. यामध्ये अस्तिक कुमार पांडे, रमेश चव्हाण, सत्यम गांधी, विशाल खत्री आणि राहुल गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे.