मुंबईकरांचे हाल कुणामुळे, याचे उत्तर सरकारने द्यायला हवं, आदित्य ठाकरेंचा सवाल

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पाण्याचा तुटवडा टँकर चालकांच्या संपामुळे निर्माण होऊ शकतो याचं गांभीर्य सरकारी बाबूंना का आले नाही ? हा देखील संशोधनाचा भाग आहे.

मुंबई – टँकर चालकांनी संप मागे घेतला आहे. पण एवढे दिवस सरकारने का भूमिका घेतली नाही, यावरुन आदित्य ठाकरेंनी सरकारला काही विचारले आहे. सरकारच्या हस्तक्षेपानंतर अखेर टँकर चालकांचा संप मागे घेण्यात आला. टँकर चालकांनी निवेदन देऊनही सरकारनं जाणीवपूर्वक संपाकडे दुर्लक्ष केलं. झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारच्या भूमिकेमुळे मुंबईकरांचे हाल झालेत. ऐन उन्हाळ्यात महावीर जयंती, हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा उत्सवाच्या काळात मुंबईकरांचा घसा कुणी कोरडा पाडला त्याचे उत्तर सरकारने द्यायला हवे असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. गेल्या पाच दिवसांपासून टँकर चालकांचा मुंबईत संप सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना दुष्काळाच्या झळा जाणवल्यात. यावरूनच आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.

इशारा देताच सरकार झोपेतून जागं झालं…

गेल्या पाच दिवसांपासून टँकर चालकांचा संप मुंबईमध्ये सुरू होता. टँकर चालकांच्या विविध मागण्यांसाठी सरकारने लक्ष घालावं यासाठी काही दिवसांपूर्वी टँकर चालकांनी सरकारला निवेदन दिले होते. मुंबईकरांचे हाल होतील हे माहिती असूनही सरकारनं टँकर चालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. आणि त्यामुळेच ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई मुंबईकरांना भासली. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पाण्याचा तुटवडा टँकर चालकांच्या संपामुळे निर्माण होऊ शकतो याचं गांभीर्य सरकारी बाबूंना का आले नाही ? हा देखील संशोधनाचा भाग आहे. मात्र सोयीनुसार मुंबई आमची म्हणणाऱ्या सरकारमधील नेत्यांनी सोयीनुसारच टँकर चालकांच्या संपाकडे दुर्लक्ष केलं. आणि त्यामुळे मुंबईकरांचे हाल सुरू झाले. यावरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाचा इशारा देताच. सरकार झोपेतून जागं झालं आणि सुरू असलेला टँकर चालकांचा संप गुंडाळला.

मुंबईकरांचे हाल कुणामुळे…

टँकर चालकांच्या मागण्या पूर्ण करण्याऐवजी आश्वासन देऊन हा संप मागे घेण्यात आला. शिवसेनेनं घेतलेली भूमिका महागात पडू शकते हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर खरंतर टँकर चालकांचा संप मागे घेण्यात आला. पण मुंबईकरांचे हाल कुणामुळे झाले याचे उत्तर सरकारने द्यायला हवं. आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत टँकर चालकांच्या संपावरून सरकारवर अनेक सवाल उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला. टँकरच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल झाले यावरूनच सरकारला आदित्य ठाकरे यांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News