घराचे स्वप्न पूर्ण होणार! शिरढोण, खोणी येथे म्हाडाच्या घराच्या किंमती एक ते दीड लाखांनी कमी

शिरढोण आणि खोणी येथे एक ते दीड लाख रुपये घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, प्रथम येणाऱ्यास प्रथम घर या प्राधान्याने ऑक्टोबर 2024 मध्ये म्हाडाने कोकण महामंडळातर्फे शिरढोण आणि खोनी येथे घरांची लॉटरी काढली होती.

Mahada – प्रत्येकाला वाटतं की, आपल्या आयुष्यात एक स्वप्नातलं घर असावे. परन्तु हे स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी अनेकांची हयात जाते. तरी पण त्यांना घर घेता येत नाही. कारण मुंबई, उपनगरसारख्या भागात घराच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना मुंबईत घर घेता येत नाही. परंतु आता म्हाडाने अत्यल्प गटासाठी 2024 मध्ये लॉटरी काढली होती. त्यातील काही घरांच्या किंमती एक ते दीड लाखाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे स्वस्तात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

किती घरांच्या किंमती कमी?

दरम्यान, शिरढोण आणि खोणी येथे एक ते दीड लाख रुपये घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, प्रथम येणाऱ्यास प्रथम घर या प्राधान्याने ऑक्टोबर 2024 मध्ये म्हाडाने कोकण महामंडळातर्फे शिरढोण आणि खोनी येथे घरांची लॉटरी काढली होती. परंतु याला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या घरांच्या किमती एक ते दीड लाख रुपये कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साधारण 6 हजार 200 पेक्षा अधिक घरांच्या किमती कमी करण्याच्या निर्णयाला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे इकडे लोकांचा घर खरेदी करण्याचा कल वाढेल, असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रतिसाद वाढेल का?

दुसरीकडे म्हाडांच्या घरांना गेल्या काही दिवसापासून कमी प्रतिसाद मिळत आहे. तेथील सुविधा पाणी, रस्ते आदी बाबी नसल्यामुळे लोकांनी म्हाडांच्या घराकडे लोंकानी पाठ फिरवली आहे. तसेच मुंबईतील 40 ते 50 लाखाचे घर खरेदी करण्याचे कुवत सामान्य लोकांनी नसल्यामुळे त्यांनी ह्या घर खरेदी करण्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. परंतु आता शिरढोण आणि खोणी येथे सुरुवातीला घराच्या किंमती 20 ते 22 लाख होत्या. मात्र आता घराच्या किंमती 18 ते 19 लाखापर्यंत केल्यामुळे आता तरी घर खरेदी करण्यास लोकांचा प्रतिसाद वाढेल का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News