सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी एक खास रिचार्ज ऑफर जाहीर केली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत, प्रत्येक रिचार्जमधून काही रक्कम संरक्षण विभागाला दान केली जाईल आणि वापरकर्त्यांना कॅशबॅकचा लाभ देखील मिळेल. या ऑफरशी संबंधित सर्व महत्वाची माहिती येथे आहे.
बीएसएनएल 1,499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर
बीएसएनएलने ही खास ऑफर मर्यादित काळासाठी सुरू केली आहे. जर एखाद्या ग्राहकाने 1,499 रु. रिचार्ज केले तर त्या रकमेपैकी 2.5% रक्कम संरक्षण विभागाला दान केली जाईल. यासोबतच, वापरकर्त्याला कॅशबॅकच्या स्वरूपात 2.5% परत मिळेल. ही ऑफर 30 जूनपर्यंत वैध आहे.

BSNL च्या 1,499 रुपयांच्या रिचार्ज प्लानचे फायदे:
या प्लानची एकूण वैधता 336 दिवस (सुमारे 11 महिने) आहे. या प्लानमध्ये यूजर्सना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 SMS, आणि 24GB हाय-स्पीड डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतरही 40 kbps वेगाने इंटरनेट सुरू राहील. याशिवाय या प्लानमध्ये रोमिंगही मोफत आहे.
दरम्यान, एलन मस्क यांच्या Starlink कंपनीला भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. ही परवानगी कंपनीसाठी एक मोठा टप्पा मानला जात आहे, कारण आता ती आपले व्यावसायिक ऑपरेशन्स सुरू करण्याच्या अगदी जवळ आहे.