दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील जखमी पर्यटकांची हेल्थ अपडेट समोर, ‘ते’ दोन पर्यटक…

पहलगामध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्येम महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे.दिलीप डिसले, अतुल मोने महाराष्ट्रातील मृत पर्यटकांची नावे आहेत.

मुंबई : जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथे आज दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्यातील माणिक पटेल आणि सी. बालाचंद्रो हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहे.

दहशतवादी हल्ल्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यामध्ये पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे म्हटले आहे.

जम्मू-कश्मीर प्रशासनाशी संपर्क

जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात मुख्यमंत्री कार्यालय आहे. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन मुख्यमंत्री फडणवीसयांनी माहिती घेतली महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला आहे.

गृहमंत्री अमित शाह पहलगाममध्ये

पहलगामध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्येम महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे.दिलीप डिसले, अतुल मोने महाराष्ट्रातील मृत पर्यटकांची नावे आहेत. सौदी अरेबियामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला त्यानंतर शहा हे तातडीने जम्मू कश्मीरमध्ये दाखल झाले. त्यांनी सर्व सुत्रे हातात घेतली असल्याची माहिती आहे.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News