पकडून दाखवा म्हणणारा रणजित कासले नरमला, पोलिसांना जाणार शरण

कासले याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. आपल्याला पकडून दाखवा, माझ्याशी पंगा घेऊ नका असे पोलिसांनाच चॅलेंज कासले याने दिले होते.

बीड :  मागील काही दिवसांपासून बीडमधील निलंबित पीएसआय रणजित कासले हा सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत नवे वाद निर्माण करत आहे. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर होणार असून यामध्ये धनंजय मुंडे यांचा देखील सहभाग असल्याचा दावा कासले याने केला होता.

कासले याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे. आपल्याला पकडून दाखवा, माझ्याशी पंगा घेऊ नका असे पोलिसांनाच चॅलेंज कासले याने दिले होते. मात्र, बुधवारी (ता.16) त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये कासले नरमलेला दिसला.

पकडून दाखवा म्हणून चॅलेंज करणारा कासले याने या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थेशी संघर्ष करू शकत नसल्याचे म्हटले. पळून काही उपयोग होणार नाही आपण पोलिसांना शरण जाणार असल्याचे त्याने जाहीर केले. याबाबत आपण आपल्या वकिलाशी चर्चा देखील केल्याचे सांगितले.

पुण्यात येणार शरण?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा परळीमधून हत्येनंतर फरार झाला होता. जवळपास एका महिन्यानंतर त्याने पुणे शहरातील सीआयडीच्या ऑफीसमध्ये सरेंडर केले होते. त्याच प्रमाणे रणजित कासले हा देखील पुण्यात शरण येणार असल्याचे काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

रणजित कासले याने वाल्मिक कराडचा एन्काऊंटर धनंजय मुंडे यांनाच करायचा असल्यादा दावा केला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे देखील अडकले असते म्हणून त्यांनी वाल्मिकच्या एन्काऊंटरचा प्लॅन केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने तो या हत्या प्रकरणातून सहीसलाम बाहेर आल्याचेही कासले याने म्हटले होते.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News