दिल्ली : पहलगाम आंतकवादी हल्ल्यात तब्बल 26 भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले. हल्ल्यानंतर भारताने कठोर पाऊले उचलत पाकिस्तानवर निर्बंध लादले आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखील सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार गैरहजर होते.
ठाकरे खासदार गैरहजर असल्याने एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टीका देखील केली होती. भाषेच्या प्रेमाचे गप्पा मारणारे राष्ट्रावर संकट आले असताना परदेशी गेलेत, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे. तसेच खासदार नरेश म्हस्के यांनी देखील संजय राऊत यांना टोला लगावात म्हटले की, मराठीच्या अस्मितेविषयी बोलणारे परदेशात गेले आहेत तर एकनाथ शिंदे हे पर्यटकांच्या मदतीला काश्मीरला गेले.

ठाकरेंचे खासदार गैरहजर का?
सर्वपक्षीय बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार गैरहजर का होते याचे उत्तर खासदार अरविंद सावंत यांनी दिले आहे. सावंत म्हणाले की, आमचे दोनही सभागृह नेते पार्लमेंटरी कमिटीच्या दौऱ्यानिमित्त बाहेर आहेत. त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. ऑनलाईन उपस्थितीबाबात आम्ही विनंती केली होती. मात्र विनंती नाकारण्यात आली आणि बैठकीनंतर यावर सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते.
विरोधी पक्ष सरकारसोबत
सर्वपक्षीय बैठकीत हल्लाच्यावेळी नेमके काय घडले हे सरकारकडून सांगण्यात आले. सरकारकडून काही त्रुटी राहिल्या असल्याची कबुली देखील देण्यात आली. दरम्यान विरोधी पक्षाकडून या विरोधात सरकार जे पाऊल उचलेले त्याला समर्थन असल्याचे सांगितले.विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित होत्या.