मुंबई – शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट सोशल मीडियावर केले आहे. “खबर पता चली क्या? ए सं शी गट ….” असं ट्विट राऊतांनी केल्यामुळे राऊतांच्या ट्विटची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे.
बकऱ्याला बे… बे… करायला सांगितलेय…
दरम्यान, टिव्टवरुन बोलताना राऊत म्हणाले की, माझ्या टिव्टचा अर्थ तुम्हाला पुढील एक दोन दिवसात समजेल. महाराष्ट्रातील एका नेत्याचा बळीचा बकरा करणार आहेत. खाटीक जसे बकरी कापायचे आधी त्या बकऱ्याला लाकडावर उभा करतोय, तसे एका नेत्याला लाकड्यावर उभं केले आहे. आणि जास्त शहाणपणा करू नको… जास्त बोलू नको… नाहीतर तुझी मान उडवू असं हळूच त्याच्या कानात दिल्लीकडून सांगण्यात आलं आहे. अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे. यानंतर राऊत यांच्या टीकेलाही शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

गाढवाने गप्प बसावं…
“नवाच्या भोंग्याने संरारा दिली, पुन्हा बांग पुन्हा एकदा नको तिथे घातलीस बघ टांग… मालकाने टाकलेलं खाऊन बें बें रोज सकाळी करायचं… जगातल्या कोणत्याही विषयावर मूर्खासारखं बरळायचं… तुमची अक्कल आणि ताकद दिसली सगळ्यांना निवडणुकात जनतेने भडकावली ना सणसणीत थोबाडात? आम्ही बकरे आहोत की वाघ ते ठरवलंय जनतेने… मला वाटतं, जास्त भेकू नये गप्प बसावं गाढवाने” असं टिव्ट खासदार नरेश म्हस्केंनी केल्यानंतर यावर संजय राऊत काय बोलतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.