शरद पवार म्हणाले, ‘हिंदू म्हणून गोळ्या घातल्याबाबतचे सत्य माहीत नाही’; फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर

गुरुवारी सर्वपक्षीय बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. या बैठकीत सरकारकडून काही तरी चुकले, अशी कबुली देण्यात आली. दरम्यान,विरोधी पक्षांकडून सरकारचे जे पाऊल उचलेल त्याला समर्थन असल्याची ग्वाही देण्यात आली.

मुंबई : पहलगाम आंतकवादी हल्ल्यावरून बोलताना शरद पवार म्हणाले की, हिंदू असल्यामुळे पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात आल्या, असं म्हटलं जातं. पण त्यामागचं सत्य काय आहे, हे मला माहिती नाही. मात्र, हल्ल्याच्या ठिकाणी महिलांना सोडलं गेलं, हे दिसून येतं. मी एका पीडित भगिनीच्या घरी गेलो होतो. त्यांनी सांगितलं की, महिलांना हातही लावला नाही, फक्त पुरुषांनाच टार्गेट करण्यात आलं.” शरद पवारांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

पत्रकारांनी शरद पवारांच्या वक्तव्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, “शरद पवारांनी नेमकं काय म्हटलं, ते मी ऐकलं नाही. पण ज्यांचे नातेवाईक या हल्ल्यात बळी पडले त्यांचे अनुभव मी ऐकले आहेत. जर हेच पवारसाहेबांचं मत असेल, तर त्यांनी स्वतः त्या पीडित कुटुंबियांची भेट घ्यावी.”

धर्माच्या नावावर तेढ निर्माण होऊ नये

शरद पवार म्हणाले की, यापूर्वी दहशतवादी हल्ले झाले पण त्यावेळी धर्माचे राजकारण झाले नाही. मग आजच धर्मावर चर्चा का होतेय? घडलेली घटना निषेधार्ह आहे. त्यामुळे देशवासीयांनी काळजी घ्यावी की, यामुळे धार्मिक तेढ वाढू नये.

सर्वपक्षीय बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित

गुरुवारी सर्वपक्षीय बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. या बैठकीत सरकारकडून काही तरी चुकले, अशी कबुली देण्यात आली. दरम्यान,विरोधी पक्षांकडून सरकारचे जे पाऊल उचलेल त्याला समर्थन असल्याची ग्वाही देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील सरकारला या मुद्दयावर समर्थन दिले. पक्षाकडून या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News