ससूनचा अहवाल सादर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलासा?

पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाकडे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणासंदर्भात रुग्णालयाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची विनंती केली होती. त्या विनंतीनुसार ससूनच्या डाॅक्टरांचे एक चौकशी पथक तयार करण्यात आले होते.

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळेत उपचार न केल्याने गर्भवती तनिषा भिसे हिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र, या प्रकरणी सरकारकडून तीन समित्यांनी चौकशी केली होती. आरोग्य विभागाच्या समितीमध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला होता. ससूनच्या समितीकडून देखील या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.

ससूने आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालकाना सादर केला आहे. तसेच तो पुणे पोलिसांना देखील दिला आहे. या अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही. मात्र, या सहा पानांच्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डाॅ. घैसास यांच्यावर कुठलाही ठपका ठेवला नसल्याची वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

पोलिसांच्या विनंतीवरून समिती

पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाकडे तनिषा भिसे मृत्यू प्रकरणासंदर्भात रुग्णालयाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची विनंती केली होती. त्या विनंतीनुसार ससूनच्या डाॅक्टरांचे एक चौकशी पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने ज्या ज्या रुग्णालयात तनिषाने उपचार घेतले त्या सर्व रुग्णालयांची चौकशी केली. त्यांचे कागदपत्रे तपासली.

अहवाल सार्वजनिक नाही…

ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीने आपला अहवाल पोस्टाने पोलिसांना पाठवला आहे. हा अहवाल अजून सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळे या अहवालामध्ये काय आहे याबाबत मराठी वृत्तवाहिनीमध्ये सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले जात आहे. लवकरच हा अहवाल सार्वजनिक करण्याची शक्यता आहे.

पहिल्या तीन अहवालांमध्ये काय?

माता मृत्यू चौकशी समिती, आरोग्य विभागाची समिती आणि धर्मादाय आयुक्त यांच्या समितीचे अहवाल पूर्वीच आले आहेत. या अहवालामध्ये तनिषाला पाच तास रुग्णालयात थांबवून ठेवण्यासाठी आरोग्य विभााच्या समितीने दीनानाथवर ठपका ठेवला होता. तर धर्मादाय आयुक्तांच्या समितीने देखील धर्मादायच्या नियमांचे पालन रुग्णालयाकडून होत नसल्याचे ठपका ठेवला होता.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News