वन डिस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन सुविधा देण्यास सुरुवात, महाराष्ट्रात नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल

जमाबंदी कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी नोंदणीसाठी लाच घेतल्याचे आरोप आहेत. त्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. चुकीचे काम करणाऱ्या कोणालाही माफ करणार नाही.

Onet District One Registration : सामान्य लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात “वन डिस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन” ही योजना अंमलात आणण्यात आली असून, नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यात कुठल्याही उपनोंदणी कार्यालयात मालमत्तेची नोंदणी करता येणार आहे. राज्यभरातील नागरिकांना ही योजना दिलासा देणारी ठरणार आहे.

त्यामुळं यापुढे एकाच जिल्ह्यातील कोणत्याही कार्यालयात नोंदणी करता येणार असल्यामुळे वेळ आणि कागदपत्रांचा त्रास टळणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मालमत्ता नोंदणीमध्ये अधिक पारदर्शकता

“वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन” ही संकल्पनाही लवकरच अंमलात आणली जाणार असून, यामध्ये नागपुरातील मालमत्तेची नोंदणी कोणत्याही जिल्ह्यातून करता येईल. यामुळं मालमत्ता नोंदणीमध्ये अधिक पारदर्शकता येणार असल्याचे बोलले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ यशस्वी व पारदर्शक असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले, एकनाथ शिंदे, अजित दादा आणि फडणवीस हे “भावासारखे” एकत्र काम करत आहेत. मी त्याचा साक्षीदार आहे. असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच

“राजकारण्यांसारखंच प्रशासनातील लोकांनीही आपली मालमत्ता जाहीर करावी,” अशी मागणी करत महसूल मंत्र्यांनी महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले. लवकरच बड्या अधिकाऱ्यांची चौकशी आणि बडतर्फी होणार असल्याचेही ते म्हणाले. जमाबंदी कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी नोंदणीसाठी लाच घेतल्याचे आरोप आहेत. त्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. चुकीचे काम करणाऱ्या कोणालाही माफ करणार नाही. असंही बावनकुळे म्हणाले.

विमातळाचा प्रश्न मार्गी लावू

पुरंदर येथील विमानतळ भूसंपादन प्रकरणात काही शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, लाठीचार्ज व जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. महसूल मंत्री म्हणाले, “शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे अजिबात मान्य नाही. लवकरच याबाबत बैठक घेऊन प्रश्न सोडवू, असा विश्वास बावनकुळे यांनी दिला.


About Author

Astha Sutar

Other Latest News