मुंबईकरांनी टाकला सुटकेचा निश्वास, अखेर टँकर चालकांचा संप मागे, आयुक्तांच्या शिष्टाईला अखेर यश

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत सुरु असलेला टँकरचालकांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय. रात्रीपासून सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आलीय. पाणीटंचाईच्या काळात टँकरचालकांनी संप मागे घेतल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळालाय.

मुंबई – गेल्या चार दिवसांपासून मुंबईत टँकर चालक असोसिएशन यांनी संप पुकारला होता. या संपाचा फटका मुंबईकरांना बसला. मुंबईतील गृहनिर्माण सोसायटी, कार्यालयं, बांधकाम व्यावसायिक या सर्वांवर याचा परिणाम जाणवला. दुसरीकडे पाण्याविना मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळल. तर मुंबईत काही कार्यालयांमध्ये पाणी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर वर्क फ्रार्म होम करण्याची वेळ आली होती. या सर्व धरतीवर आज टँकर चालक असोसिएशन आणि मुंबई पालिका आयुक्त भूषण गगरानी यांच्यात बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर आज सायंकाळी पुन्हा एकदा टँकर असोसिएशनच्या सदस्यांची बैठक पार पडली असून, संपाबाबत या बैठकीतून मोठा निर्णय घेण्यात आला.

चार दिवसानंतर अखेर संप मागे…

दरम्यान, मुंबईत गेल्या चार दिवसांपासून मुंबईकरांना टँकर चालकांच्या संपामुळे त्रास झाला. यानंतर आज मुंबई पालिका आयुक्त भूषण गगरानी आणि टँकर चालक संघटना यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे नेते देखील उपस्थित होते. यावेळी टँकर असोसिएशनचे शिष्टमंडळ यांनी ज्या आपल्या मागण्या होत्या, त्या आयुक्तासमोर ठेवल्या. आयुक्तांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठक अगदी सकारात्मक संपन्न झाली आहे. परंतु आता टँकर चालक असोसिएशन पुन्हा यावर एकत्र बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील. आज पुन्हा एकदा सायंकाळी बैठक त्यातून ते संपाबाबत सकारात्मक निर्णय घेतील् असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी व्यक्त केला होता. यानंतर आज 4.00 वाजता टँकर चालक संघटनेच्या सदस्यांची मिटींग झाली. आणि सर्व चर्चा केल्यानंतर चार दिवसानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज रात्रीपासून सेवा पूर्ववत…

दुसरीकडं संप मागे घेतल्यानंतर जिथे लोंकाना पाण्याची गरज आहे…आवश्यक्ता आहे. त्या ठिकाणी पाणी पुरवठा केले जाईल. तसेंच आज रात्रीपासून सेवा पूर्ववत करून रात्रभर पाणी पुरवठा करण्यात येईल, संपावर तोडगा निघाला असल्यामुळे पाणी पुरवठा व्यवस्थित होईल, असं टँकर चालक संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले आहे. त्यामुळे पाण्यविना मुंबईकरांच हाल झाले. यानंतर चार दिवसानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News