मुंबई – दोन वर्षांपूर्वी म्हणजेच जानेवारी 2023 साली प्रसिद्ध झालेल्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षेच्या जाहिरातीत निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. दोन वर्षांपूर्वी अराजपत्रित बट ब आमि गट कसाठी ही संयुक्त पूर्व परीक्षा झाली होती. दोन वर्ष उलटूनही नियुक्ती न मिळाल्यानं उमेदवारांमध्ये संतापाची लाट दिसतेय.
पदवीनंतर दोन ते चार वर्ष एमपीएससीचा अभ्यास करायचा, एमपीएससीच्या जाहिरातीची वाट पाहायची, परीक्षा जाहीर झाल्यानंतर अभ्यासक्रमाचं टेन्शन, परीक्षा झाल्यानंतर निकालात चांगले गुण मिळायची वाट पाहायची, त्यानंतर तोंडी परीक्षेचीतयारी तयारी करायची. इतकं करुन निवड झाली तरी नियुक्ती कधी, ही एक नवी परीक्षा असल्याचं मत हे एमपीएससीचे यशस्वी उमेदवार व्यक्त करतायेत.

कधी मिळणार नियुक्ती?
- एमपीएससीच्या 8170 पदांची नियुक्ती रखडलेली आहे.
- त्यातही गट क मधील लिपिक टंकलेखक 7035 पदांची सर्वसाधारण यादी जाहीर झाली असली तरी अंतिम निवड यादी अद्याप जाहीर झालेली नाही
- कर सहायक 468 पदांची नियुक्ती रखडलेली असून कागदपत्रांच्या पडताळणीचं कारण देण्यात येतंय.
- राज्य उत्पादन शुल्क विभागातील 5 पदं यांची नियुक्ती रखडलेली आहे. तांत्रिक सहाय्यक 1 पद याचा निकालच लागलेला नाही.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचंही आंदोलन
एमपीएससीच्या परीक्षेसाठी वेळ वाढवून द्यावी, या मागणीसाठी पुण्याच्या बालगंधर्व चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रात्री आंदोलन केलंय. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बालगंधर्व चौकात मुख्य रस्त्यावर एमपीएससीचे विद्यार्थी जमल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर पोलिसांनी यातील काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं.
अनेक दिवसांपासून विद्यार्थी पाठपुरावा करत असतानाही आयोग किंवा सरकार विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीची दखल घेत नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय येतो का?
आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा महायुती सरकारच्या दृष्टीने गुन्हा आहे का? पुण्यात शांततेत आंदोलन करणाऱ्या #MPSC… pic.twitter.com/phBqk5fc7P
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 11, 2025
या आंदोलनात अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे याही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय.दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक्स पोस्ट करत परीक्षेची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती.
रुपाली ठोंबरेंची काय एक्स पोस्ट?
पुन्हा MPSC आयोगाचा भोंगळ कारभार सातत्याने आयोगाच्या कामकाजावर अनेक वेळा विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागतं, अशा गचाळ व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरकारने बदललेच पाहिजे.
त्यात नाहक आपले महायुती सरकार अशा अधिकाऱ्यांमुळे बदनाम होतंय. MPSC ने राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल दोन टप्प्यात लावून EWS कॅटेगिरी मधील मुलांचा सतरा दिवसाचा वेळ वाया घालवला.या सर्व प्रक्रियेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यानाचे अतोनात नुकसान झालेले असून वेळही वाया गेलेला आहे त्यामुळे या सर्व गोष्टींची आयोगाच्या चुकीच्या कारभारामुळे लागल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची 45 दिवस विद्यार्थ्यांची मागणी ही न्यायिक आणि संविधानिकच आहे.