पुणे रिंग रोडसाठी एमएमआरडीएचा मास्टर प्लान; काम वेळेत पूर्ण होणार?

पुण्याच्या वाहतूक कोंडीसाठी रिंग रोड रामबाण उपाय ठरणार आहे, या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी आता एमएमआरडीएने मास्टर प्लान आखला आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी हा अलिकडच्या काळात एक अत्यंत गंभीर विषय बनला आहे. यावर रिंग रोड प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. 172 किलोमीटर लांब आणि 110 मीटर रुंदीचा हा रिंग रोड प्रकल्प पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व भागात सात आणि पश्चिम भागात पाच टप्पे आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे 42 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

काम वेळेत पूर्ण करण्याचा मानस

पुणे रिंग रोड प्रकल्प मुदतीतच पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसीने आखला मास्टर प्लॅन आखला आहे. अडीच वर्षांत हा रिंग रोड वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे काम देखील वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाशी संबंधित ठेकेदार कंपन्यांनी मुदतीपूर्वी प्रकल्प पूर्ण न केल्यास किंवा काम रखडवल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.

पश्चिम विभागासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 99 टक्के आणि पूर्व विभागासाठी 98 टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. म्हणजेच, प्रकल्पासाठी सुमारे 1,740 हेक्टर जमीन ताब्यात आली आहे. कंत्राटदार कंपन्यांनी वाडेबोल्हाई, खडकवासला, सिंहगड, मुळशी, उर्से, चाकण, हिंजवडी, सोरतापवाडी या ठिकाणी एकत्रितपणे प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आहे. निर्धारित मुदतीत काम पूर्ण न केल्यास सरकारी नियमांनुसार कंत्राटदार कंपन्यांनादंड ठोठावला जाणार आहे.

रिंग रोड प्रकल्पासाठीचे जमीन संपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलली जात आहे. यासाठी एमएसआरडीसीने एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. पुढील अडीच वर्षांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

पुणे रिंग रोडचे मोठे महत्व

पुणे रिंग रोड प्रकल्पाचे शहरासाठी मोठे महत्त्व आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाढत्या वाहतूक समस्यांवर उपाय म्हणून हा रिंग रोड उपयुक्त ठरेल. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक दाटी कमी होईल आणि शहराबाहेरील वाहनांना थेट मार्ग उपलब्ध होईल. वेळ आणि इंधनाची बचत होऊन पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल. तसेच औद्योगिक व व्यापारी विकासालाही चालना मिळेल. शहराच्या चारही बाजूंना संपर्क सुलभ होईल, ज्यामुळे आपत्कालीन सेवा आणि मालवाहतूक अधिक वेगाने होऊ शकेल. पुण्याच्या समतोल आणि दीर्घकालीन विकासासाठी हा रिंग रोड अत्यंत आवश्यक आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News